नगरसेवक ते केंद्रात मंत्री; मोदी सरकारमध्ये औरंगाबादच्या भागवत कराड यांना राज्यमंत्री पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:04 PM2021-07-07T16:04:22+5:302021-07-07T16:05:31+5:30
Dr. Bhagvat karad in modi's cabinet : औरंगाबाद शहरात वैद्यकीय व्यवसाय करत असताना १९९६ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
औरंगाबाद : राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांना केंद्रात राज्यमंत्री पद मिळाले असल्याची माहिती भाजप प्रवक्ता शिरीष बोराळकर यांनी सोशल मीडियातून दिली आहे. शेतकरी पुत्र असलेल्या डॉ. कराड यांचा नगरसेवक ते केद्रात मंत्री असा राजकीय प्रवास झाला आहे. त्यांना मंत्रिपद देऊन भाजपने एकप्रकारे राज्यातील ओबीसींना मोदी सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिले आहे. ( Bhagwat Karad of Aurangabad in the Modi government)
डॉ. कराड हे अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील असून, त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शहरात वैद्यकीय व्यवसाय करत असताना १९९६ ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद शहराचे दोनवेळा महापौर, भाजप राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष आणि दोन वर्षे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मराठवाड्यात भाजप वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार डॉ.भागवतजी कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढिल वाटचालीस शुभेच्छा...!@Dev_Fadnavis@DrBhagwatKaradpic.twitter.com/69LJGdzPyU
— Shirish Boralkar (@ShirishBoralkar) July 7, 2021
मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन
शेतकरी कुटुंबातील डॉ. भागवत कराड यांनी बालपण अत्यंत हालाखीत गेले. रोज ५ किमीची पायपीट करत त्यांनी १२ वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. पुढे उच्च शिक्षण घेत ते मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन बनले. औरंगाबाद शहरात वैद्यकीय व्यवसाय सुरु केल्यानंतर काही काळाने भाजपचे सदस्यत्व घेत सक्रीय राजकारणात प्रवेश घेतला.
43 leaders to take oath today in the Union Cabinet expansion. Jyotiraditya Scindia, Pashupati Kumar Paras, Bhupender Yadav, Anupriya Patel, Shobha Karandlaje, Meenakshi Lekhi, Ajay Bhatt, Anurag Thakur to also take the oath. pic.twitter.com/pprtmDu4ko
— ANI (@ANI) July 7, 2021
राजकीय कारकीर्द :
१) भाजपकडून राज्यसभा सदस्य ( २०२० )
२) भाजपचे सभागृह नेते, औरंगाबाद महानगरपालिका (१९९९ -२००९)
३) औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर ( एप्रिल २००० ते ऑक्टोबर २००१ आणि नोव्हेंबर २००६ ते ऑक्टोबर २००७ - २ वेळा महापौर)
४) औरंगाबाद महानगरपालिकेचे उपमहापौर (१९९७-११९८ )
५) स्थायी समिती सदस्य, औरंगाबाद महानगरपालिका (१९९५-१९९७ )
६) औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवक ( १९९५ ते २०१० या काळात तीन वेळा )