नगरसेवक तनवाणी, आहुजा ‘अंडरग्राऊंड’

By Admin | Published: September 8, 2015 12:33 AM2015-09-08T00:33:04+5:302015-09-08T00:40:18+5:30

औरंगाबाद : पहाडसिंगपुरा येथे अनधिकृत रेखांकनामधील भूखंड विक्री करून शेकडो गोरगरीब नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले नगरसेवक

Corporator Tanvani, Ahuja 'Underground' | नगरसेवक तनवाणी, आहुजा ‘अंडरग्राऊंड’

नगरसेवक तनवाणी, आहुजा ‘अंडरग्राऊंड’

googlenewsNext


औरंगाबाद : पहाडसिंगपुरा येथे अनधिकृत रेखांकनामधील भूखंड विक्री करून शेकडो गोरगरीब नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले नगरसेवक राजू तनवाणी आणि राज आहुजा हे दोन्ही आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत असल्याची या दोघांना पोलीस दलातील त्यांच्या ‘खबऱ्या’कडून आधीच खबर पोहोचविण्यात आली. त्याचा फायदा घेत हे दोन्ही आरोपी अटक टाळण्यासाठी पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मकबरा परिसरातील पहाडसिंगपुरा येथील सर्व्हे नंबर ९९/२ मधील ग्रीन झोन जमिनीवर रेणुकानगर नावाने अवैध रेखांकन तयार करून तेथे २० बाय ३० आकाराचे २१० भूखंड पाडले. पहाडसिंगपुरा येथील सर्व्हे नंबर ९९/१ आणि ९९/२ मधील १८ एकर २९ गुंठे जमिनीच्या मालकीहक्काबाबत मूळ मालक माधवराव सोनवणे विरुद्ध हिंमतराव कोरडे यांच्यात न्यायालयात वाद सुरू होता. वाद सुरू असताना कोरडे यांचे वारस संतराम कोरडे यांनी ५ एकर ३९ गुंठे जमीन राजू तनवाणी यांना आम मुख्यत्यारपत्र (जीपीए) करून दिले. जीपीएच्या आधारे तनवाणी आणि राज आहुजा यांनी तत्कालीन तलाठ्याच्या मदतीने रेणुकानगर नावाने अनधिकृत ले-आऊट करून २१० प्लॉट पाडले. तनवाणीकडून जीपीए करून घेत आहुजाने गोरगरीब आणि अल्पशिक्षित लोकांना लाखो रुपयांत भूखंड विक्री केले. याप्रकरणी विशेष म्हणजे या जमिनीबाबत कोर्टात वाद सुरू असल्याचे त्यांनी त्यांच्यापासून लपवून ठेवले.
दरम्यान ही जमीन सोनवणे यांच्या वारसांच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या आदेशानुसार ३१ आॅगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करून तेथील रहिवाशांकडून घरे खाली करून घेतली. बेघर झालेल्या शंभरहून अधिक रहिवाशांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आमची फसवणूक केली असून, भूखंड माफियावर कारवाई करण्याची विनंती केली. रामदास ढोले यांच्या तक्रारीवरून रविवारी रात्री आरोपींविरोधात बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अटकपूर्व जामिनासाठी...
आरोपी राजू तनवाणी हे गुलमंडी वॉर्डाचे नगरसेवक आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू आहेत. तर राज आहुजा हे त्यांचे निकटवर्तीय आहेत. अटक टाळण्यासाठीच त्यांना न्यायालयात धाव घेण्याची संधी देण्यासाठीच त्यांच्यापर्यंत गुन्हा दाखल झाल्याची वार्ता आधीच पोहोचविण्यात आली असावी, अशी चर्चा आज सुरू आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोपींचा शोध सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, आरोपी पळून कोठे जातील? त्यांना न्यायालयासमोर यावेच लागणार आहे. दरम्यानच्या काळात आम्ही त्यांच्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा क रीत आहोत. आरोपींना जामीन मिळू नये, इतके पुरावे न्यायालयासमोर सादर करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Web Title: Corporator Tanvani, Ahuja 'Underground'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.