भ्रष्टांना नगराध्यक्षांचे अभय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:29 AM2017-08-02T00:29:09+5:302017-08-02T00:29:09+5:30
भ्रष्ट कर्मचाºयांना डॉ.भारतभूषण क्षीरसागरच पाठिशी घालत असल्याचा आरोप काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांनी आायोजित केलेल्या विशेष सभेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. यामध्ये काही कर्मचाºयांचा समावेश आहे. या भ्रष्ट कर्मचाºयांना डॉ.भारतभूषण क्षीरसागरच पाठिशी घालत असल्याचा आरोप काकू-नाना आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांनी आायोजित केलेल्या विशेष सभेत केला. तसेच या सभेत पालिकेतील दोन कर्मचाºयांच्या कारवाईसाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचा ठराव सभेत घेण्यात आला. पिठासिन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी काम पाहिले.
बीड पालिकेतील वाद दिवसेंदिवस वाढतच आहेत. नगराध्यक्ष आणि काकू-नाना आघाडी नेहमी एकमेकांवर आरोप करून पालिकेतील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणत आहेत. लेखापाल गणेश पगारे आणि ट्रेसर सलीम यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यांना दोषी ठरवूनही नगराध्यक्ष त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असा दावा करत त्यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यासाठी पालिकेची विशेष सभा बोलावण्याची मागणी काकू-नाना आघाडीचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती अमर नाईकवाडे व इतरांनी केली होती. नगराध्यक्षांनी ती मान्य न केल्याने नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेतली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी विशेष सभेचे आयोजन केले होते. जिल्हाधिकाºयांच्या या आदेशाला विभागीय आयुक्तांकडून स्थगिती आणण्याचा प्रयत्न डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले.
अखेर मंगळवारी दुपारी पालिका सभागृहात ही बैठक झाली. एमआयएम नगरसेवकांच्या अस्थिर भूमिकेमुळे बैठकीसाठी गणपूर्ती होईल का? यावरच प्रश्नचिन्ह होते, मात्र अर्धा तासाच्या प्रतिक्षेनंतर आघाडीच्या नागरसेवकांसोबतच एमआयएम स्वतंत्र गटाच्या काही नगरसेवकांनी बैठकीला हजेरी लावल्याने गणपूर्ती झाली. पीठासन अधिकाºयांनी या विषयावर प्रत्येक सदस्याला मत मांडण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ दिला होता. मात्र उपस्थित सर्वच सदस्यांनी अमर नाईकवाडे हेच भूमिका मांडतील, असे सांगत नाईकवाडेंकडे सारी सूत्रे सोपविली. अमर नाईकवाडे यांनी विविध चौकशी अहवाल, तक्रारी सभागृहासमोर मांडून या गैरप्रकारांना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हेच पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. या दोन्ही कर्मचाºयांविरूद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे बैठक सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनीही बैठकीला हजेरी लावली.