शिक्षण विभागात शिपायापासून सचिवांपर्यंत भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:31 PM2019-07-20T23:31:22+5:302019-07-20T23:32:12+5:30

राज्यातील शिक्षण विभागात प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे. संस्थाचालकांचे कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय होत नाही. शिपायापासून सचिवांपर्यंत सर्वच भ्रष्टाचारी असल्याचा आरोप महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे (मेस्टा) अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

The corruption in the education department from the soldiers to the secretaries | शिक्षण विभागात शिपायापासून सचिवांपर्यंत भ्रष्टाचार

शिक्षण विभागात शिपायापासून सचिवांपर्यंत भ्रष्टाचार

googlenewsNext
ठळक मुद्देआरोप : महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचा प्रबोधन मेळावा

औरंगाबाद : राज्यातील शिक्षण विभागात प्रचंड भ्रष्टाचार वाढला आहे. संस्थाचालकांचे कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय होत नाही. शिपायापासून सचिवांपर्यंत सर्वच भ्रष्टाचारी असल्याचा आरोप महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे (मेस्टा) अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
मेस्टा संघटनेतर्फे जिल्ह्यातील इंग्रजी शाळा संस्थाचालकांचा प्रबोधन मेळावा शनिवारी (दि.२०) शहरातील एका हॉटेलमध्ये पार पडला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तायडे यांनी शिक्षण विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तायडे म्हणाले, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुमारे १०० शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत़ शिक्षण विभागातील अधिकारी आर्थिक देवाणघेवाणीमुळे त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत़ शिक्षण विभागाची परवानगी नसतानाही शाळा कशा सुरू राहतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या इंग्रजी शाळांना व्यावसायिक कर भरावा लागतो़ परंतु औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत येणाºया इंग्रजी शाळांना व्यावसायिक करापेक्षाही पाचपट जास्तीची कर आकारणी करण्यात येते़ परिणामी या शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांवर त्याचा आर्थिक भार पडतो. शाळा चॅरिटेबल ट्रस्ट, सेवाभावी संस्थांच्या अंतर्गत सुरू आहेत़ त्यांना कंपनी कायदा लागू होत नाही. त्यानुसार मनपा असा व्यावसायिक कर सक्तीने वसूल करू शकत नाही़ मनपा सर्व नियम धाब्यावर बसवून इंग्रजी शाळांकडून कराची सक्ती करीत आहे़ यास विरोध म्हणून वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा तायडे यांनी यावेळी दिला़. यावेळी मिलिंद पाटील, एस़ पी़ जवळकर, सतीश गोरे, संतोष सोनवणे, शेख झिया, मनीष हंडे, राजू नगरकर, शकील शेख, अ‍ॅड.अविनाश औटे आदी उपस्थित होते़
----------

Web Title: The corruption in the education department from the soldiers to the secretaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.