अनलॉकनंतर कॉस्मॅटिक सर्जरीसाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:02 AM2021-06-26T04:02:06+5:302021-06-26T04:02:06+5:30

चौकट डॉ. दहिफळे हॉस्पिटलमध्ये सुविधा केव्हा करतात लेसर उपचार... १) शरीराच्या कोणत्याही भागातील नको असलेल्या केसांसाठी कायमस्वरूपी उपचार केले ...

For cosmetic surgery after unlocking ... | अनलॉकनंतर कॉस्मॅटिक सर्जरीसाठी...

अनलॉकनंतर कॉस्मॅटिक सर्जरीसाठी...

googlenewsNext

चौकट

डॉ. दहिफळे हॉस्पिटलमध्ये सुविधा

केव्हा करतात लेसर उपचार...

१) शरीराच्या कोणत्याही भागातील नको असलेल्या केसांसाठी कायमस्वरूपी उपचार केले जातात.

२) तारुण्यापिटिका किंवा मोड्या व त्यामुळे पडलेले खड्डे. रक्तवाहिन्यांच्या जाळ्या.

३) काळ्यानिळ्या जन्मखुणा व डाग. काळे व तपकिरी लालसर, चामखीळ.

४) शस्त्रक्रियेचे अथवा मार लागून झालेले व्रण. किलॉईड, प्रसूतीपश्चातचे स्ट्रेचमार्क.

५) चेहऱ्यावरील वांग, गोंदण, उतारवयातील सुरकत्या, पायावरील फुगलेल्या शिरा.

या सर्वांवर लेसर उपचार उपयुक्त, प्रभावी ठरत आहे.

---

चौकट

कॉस्मॅटिक सर्जरीचे फायदे

१) कॉस्मॅटिक सर्जरीद्वारे अनावश्यक चरबी काढून शरीर सुडौल बनविले जाते.

२) नाकाचे व्यंग दूर करण्यासाठीही शस्त्रक्रिया केली जाते.

३) हेअर ट्रान्सप्लान्ट अर्थात केशरोपण करणे.

४) स्तनवृद्धी व स्तनांचा आकार बदलणे या सर्जरीमुळे शक्य होते.

५) या सर्जरीने चेहऱ्याला नवकांती मिळते.

---

चौकट

प्लास्टिक सर्जरी कोणावर केली जाते...

१) जन्मत: व्यंग असलेल्यांवर प्लास्टिक सर्जरी उपायकारक ठरू शकते.

२) फाटलेले ओठ, टाळू आणि लघवीच्या जागेतील व्यंगे.

३) त्वचेवरील डाग व व्रण, भाजल्याने निर्माण झालेली व्यंगे व आखडलेले सांधे.

४) हातावरील दुखापत व इजा, वंध्यत्वावर मायक्रोसर्जरी, लिंग बदल शस्त्रक्रिया व व्हजायनोप्लास्टी करता येते.

------

चौकट

अन्य उपचार सुविधा...

१) दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया (टी.यु.आर.पी).

२) दुर्बिणीद्वारे मुतखड्याची शस्त्रक्रिया (पी.सी.एन.एल.युरेटोस्कोपी).

३) पुरुष वंध्यत्व व नपुंसकता त्यांचे निदान व उपचार.

४) नवजात शिशु व लहान मुलांचे लघवीचे आजार.

५) स्त्रियांमधील लघवीचे आजार.

६) मूत्रपिंड, मुत्राशय, प्रोस्टेट आणि पुरुषांचे इंद्रिय व अंडकोषाच्या कर्करोगाचे निदान, उपचार.

७) सी-आर्म इमेज इंटेंसीफायर, लिथोट्रेप्सी, एक्स-रे.

८) मूत्रपिंड प्रत्यारोपण, मायक्रोसर्जरी, हायपोस्पेडीक्स रिपेअर.

९) रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी (मूत्रमार्गातील व्यंग दुरुस्त करणे)

---------

चौकट

नवोदित अभिनेत्रींचा कॉस्मॅटिक सर्जरीकडे ओढा

प्लास्टिक सर्जन डॉ. उज्वला दहिफळे यांनी सांगितले की, मुंबईत मराठी चित्रपट व बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्री व अभिनेते कॉस्मेटिक सर्जरीसाठी औरंगाबादेत डाॅ. दहिफळे हॉस्पिटलमध्ये येत असतात. विशेषत: नवोदित अभिनेत्री, मॉडेल या स्तनवृद्धी व स्तनांचा आकार बदलणे, तर नवोदित अभिनेते हे नाकाचे व्यंग दूर करण्यासाठी, शरीराच्या कोणत्याही भागातील नको असलेले केस कायमस्वरूपी काढण्यासाठी लेसरचा उपचार करतात. चेहऱ्याला नवकांती देण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी करून घेतात.

चौकट

१८ ते ३० वयोगटातील तरुणाईचा जास्त कल

कॉस्मॅटीक सर्जरी असो वा लेसर उपचार, यासाठी १८ ते ३० वयोगटातील तरुणाई हॉस्पिटलमध्ये येत असते. विशेषत: नाकातील व्यंगपणा घालविण्यासाठी कॉस्मॅटिक सर्जरी करण्यावर भर असतो. ज्या तरुण-तरुणींचे लग्न होण्यास त्यांचे नाकातील व्यंग अडथळा ठरते, असे युवक-युवती कॉस्मॅटिक सर्जरी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येतात व यशस्वी सर्जरी होताच नवसौंदर्य प्राप्त झाल्याने आनंदी होऊन जातात.

(डॉ. दहिफळे एलएमएस जोड १)

Web Title: For cosmetic surgery after unlocking ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.