किडीत गुरफटला कापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:14 AM2017-09-02T00:14:37+5:302017-09-02T00:14:37+5:30
पावसाची हजेरी कमी अन् ढगाळ वातावरण जास्त, अशा स्थितीत पांढरे सोने (कापूस) पीक अडचणीत सापडले़ रस शोषण करणाºया किडीत कापूस गुरफटल्याने शेतकºयांची मोठी धावपळ उडाली आहे़ किडीचा प्रतिबंध करण्यासाठी फवारणीने शिवारात एकच धांदल उडाली आहे, असे चित्र तालुक्यात दिसत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : पावसाची हजेरी कमी अन् ढगाळ वातावरण जास्त, अशा स्थितीत पांढरे सोने (कापूस) पीक अडचणीत सापडले़ रस शोषण करणाºया किडीत कापूस गुरफटल्याने शेतकºयांची मोठी धावपळ उडाली आहे़ किडीचा प्रतिबंध करण्यासाठी फवारणीने शिवारात एकच धांदल उडाली आहे, असे चित्र तालुक्यात दिसत आहे़
गत १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून ते पांढºया सोन्याच्या मुळावर आले़, असेच म्हणावे लागेल. रस शोषण करणाºया किडीचा (मावा, तुडतुडे, फूलकिडे, पांढरी माशी) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला़ आणि कापूस पानातून रस शोषून घेण्यास किडीने वेग घेतला़ पाने लालसर होत राहिली़ पाने अन्नद्रव्ये घेण्याच्या प्रक्रिया मंदावली़ किडीने पिकाची वाढ खुंटते, कापूस बोंड भरण्याची प्रक्रिया मंदावून उत्पादन घटणार या चिंतेने शेतकरी अधिक चिंतीत झाला़
कंधार महसूल मंडळातील २५ महसुली गावांत २ हजार ८१० हेक्टर लागवड केलेले कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले़ कुरुळा मंडळातील २२ गावांत २ हजार ३४० हेक्टर, फुलवळ मंडळातील २१ गावांतील २ हजार ८४७ हेक्टर, उस्माननगर मंडळातील १७ गावांत ३ हजार ३३८ हेक्टर, पेठवडज मंडळातील १८ गावांत ३ हजार ६० हेक्टर आणि सर्वाधिक बारूळ मंडळातील २० गावांतील ४ हजार ३८ हेक्टर लागवड केलेल्या शेतकºयांची मोठी गाळण उडाली़ एकीकडे पाऊस साथ देत नाही, आॅनलाईन सेवा वेळेत मिळत नसल्याने कर्जमाफीसाठीचे अर्ज दाखल करताना अडचणीचा सामना करावा लागतो़ त्यात कापसावर कीड प्रतिबंधासाठीची फवारणी करताना शेतकºयांची दमछाक उडत आहे़ पावसाअभावी पीक अपेक्षित आले नाही़ त्यात पुन्हा किडीचा शिरकाव झाल्याने शेतकरी संकटमालिकेवर मात करण्याचा आटोकाट प्रयत्न करतानाचे चित्र आहे़
पिकावरील कीड नियंत्रणासाठी कृषी विभाग मोहीम राबवित आहे़ गावातील कृषी वार्ता फलकावर फवारणीची माहिती देण्यासाठी सक्रिय झाला आहे़ सदर माहिती आधारावर शेतकरी शिवारात फवारणी करतानाचे चित्र आहे़