शेतकऱ्यांनी केली ठिबकवर कापसाची लागवड
By Admin | Published: June 12, 2014 11:55 PM2014-06-12T23:55:25+5:302014-06-13T00:36:46+5:30
मंठा : तालुक्यात शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनवर या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.
मंठा : तालुक्यात शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनवर या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असून शेतकरी शेतीची मशागतीची कामे युध्द पातळीवर करत असल्याचे चित्र आहे.
मंठा तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने विहिरींना बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. भरपूर पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी सिंचनवर ऊसाची तर अल्प पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड केली आहे. बँक आॅफ महाराष्ट्र शाखा मंठाने ठिबक सिंचन वाढीला महत्व देऊन अधिक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन करिता कर्ज दिले तर काही शेतकऱ्यांनी पतसंस्था, फायनांस कंपन्या यांच्याकडून कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली आहे. उर्वरित शेतकरी मशागत करून सोयाबीन पेरणीला जादा प्राधान्य देणार असल्याचे चित्र आहे. यावर्षी दीडपटीने सोयाबीनची पेरणी होणार असून शेतकऱ्यांनी यंदा घरचेच सोयाबीन पेरणीसाठी वापरत असल्याचे येथील कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बरदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात कृषी विभाग कमी पडत असून शेतकऱ्यांना खेटे मारूनही शेती पीक पेरणी बाबत योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)
या तालुंक्यात यावर्षी वेळेवर पाऊसबरसेल अशी अपेक्षा होती. परंतु अद्यापपर्यंत मृगाचा पाऊस दाखल झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. विशेषत: कापूस उत्पादकांना चिंतेने ग्रासले आहे. गेल्यावर्षी वेळवेर पाऊस दाखल झाला होता.