कापूस उत्पादन घटले, १०० सूत गिरण्या बंद 

By बापू सोळुंके | Published: December 31, 2023 09:21 AM2023-12-31T09:21:30+5:302023-12-31T09:22:09+5:30

...परिणामी, मागील दहा वर्षांत मराठवाड्यातील सुमारे १०० जिनिंग प्रेसिंग बंद पडल्याची धक्कादायक माहिती आहे. 

Cotton production down, 100 yarn mills closed | कापूस उत्पादन घटले, १०० सूत गिरण्या बंद 

कापूस उत्पादन घटले, १०० सूत गिरण्या बंद 

छत्रपती  संभाजीनगर : पांढरे सोने म्हणून शेतकऱ्यांची कापूस लागवडीला पहिली पसंती असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत कापसाचा उत्पादन खर्च दरवर्षी वाढतच आहे, त्या प्रमाणात कापसाचे दर न वाढल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीनला पसंती दिली. परिणामी, मागील दहा वर्षांत मराठवाड्यातील सुमारे १०० जिनिंग प्रेसिंग बंद पडल्याची धक्कादायक माहिती आहे. 

 मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी खरीप हंगामात सरासरी  ४८ लाख ३० हजार ८५३ हेक्टरवर पेरणी केली जाते.  १० वर्षांपूर्वी मराठवाड्यातील ६० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड व्हायची. तेव्हा मुबलक प्रमाणात कापसाचे उत्पादन होत. शेतकऱ्यांकडून शासनच कापूस खरेदी करीत होते. तेव्हा खासगी व्यापाऱ्यांना कापूस खरेदीची परवानगी नव्हती. 

व्यापाऱ्यांना कापूस खरेदीची परवानगी देण्यात आल्यानंतर येथील व्यापारी मध्य प्रदेशातील खंडवा येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या जिनिंग प्रेसिंग चालकांना कापूस नेऊन विकत असत. मराठवाड्यात मुबलक प्रमाणात कापूस उपलब्ध होत असल्याने दहा ते पंधरा वर्षांपूर्वी येथे सुमारे १५० हून अधिक जिनिंग, प्रेसिंग उभ्या राहिल्या होत्या. यात काही सहकारी सूतगिरण्यांही होत्या. 
कापसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळले असून कापसाचे उत्पादन २८ टक्क्यांपर्यंत कमी झाले.
 

Web Title: Cotton production down, 100 yarn mills closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.