जिल्ह्यात कापूस उत्पादन घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:45 AM2017-09-10T00:45:53+5:302017-09-10T00:45:53+5:30

यंदा कापूस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

Cotton production will decline in the district | जिल्ह्यात कापूस उत्पादन घटणार

जिल्ह्यात कापूस उत्पादन घटणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या कमी पावसाचा सर्वच पिकांना फटका बसला आहे. मूग व उडीद पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असल्याने सध्या पडत असलेल्या पावसाचा या पिकांना फायदा होणार नाही. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कपाशीला जीवदान मिळाले आहे. असे असेल तरी यंदा कापूस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
जिल्ह्यात यंदा एकूण सरासरीच्या ९३.६ टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली आहे. कृषी विभागाच्या या आठवड्यातील पीक परिस्थिती अहवालानुसार कपाशीची झाडे बोंडे लागण्याच्या अवस्थेत आहेत.
झाडांवर गुलाबी बोंडअळी व रस शोषक किडीसह आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बागायती क्षेत्रात ठिबकने पाणी दिलेल्या शेतांमधील कपाशीची वाढ चांगली झाली असून, पावसाचा फायदा होत आहे.
कपाशीच्या झाडाला आता असलेली पाते, फुले, बोंडे यांची प्रत्यक्ष निरीक्षणे घेऊन कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने अंदाज काढला असता, बागायती क्षेत्रात रुई ७३४ किलोग्रॅम प्रति हेक्टर तर कोरडवाहू क्षेत्रातील उत्पादकता ४६१ किलो ग्रॅम येत आहे. ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. परिणामी कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा ५३ हजार ६८७ हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. तुरीचे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. हे दीर्घ मुदतीचे पीक असल्यामुळे उत्पादकतेवर फारसा परिणाम होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
मका पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. वाढीच्या अवस्थेत अल्प पावसामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्याने मका उत्पादनात घट होणार आहे.

Web Title: Cotton production will decline in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.