सेंद्रिय बोंडअळीमुळे कापूस उतारा घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:10 AM2017-11-16T00:10:41+5:302017-11-16T00:10:45+5:30
बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बीटी बियाणाची शेतकरी लागवड करतात परंतु या वर्षी जवळपास सर्वच बीटी बियाणाच्या कापसावर सेंद्रीय बोंड आळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतक-यांची फसवणूक झाली आहे.
धारुर : चालू वर्षीच्या खरीप हंगामात धारुर तालुक्यात कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पेरणीस वेळेवर चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी कापूस पिकास मोठी पसंती दिली होती. परंतु कापसाच्या सेंद्रीय बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याने कापूस बोंडातच किडला आहे.
मागील दोन वर्षांच्या तुलनेत कापूस पिकास उताराही मिळण्याची शेतक-यांना अपेक्षा होती. बोंडअळीमुळे कापसाच्या उताºयात मोठी घट झाली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बीटी बियाणाची शेतकरी लागवड करतात परंतु या वर्षी जवळपास सर्वच बीटी बियाणाच्या कापसावर सेंद्रीय बोंड आळीचा प्रादूर्भाव झाल्याने शेतक-यांची फसवणूक झाली आहे.
तालुक्यात चालू वर्षीच्या हंगामात सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लाागवड झालेली आहे. वेळेवर पडत गेलेल्या पावसामुळे कापूस उत्पादनात चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हंगामी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतक-यांनी कापूूस लागवडीस जास्त महत्व दिले होते.
मागील काही वर्षात कापूस पिकाला जोपासना करुन पीक चांगले आल्यास बोंडअळीचा प्रादूर्भाव होवून कापूस पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत होते. परंतु मागील सात ते आठ वर्षात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून सर्वच कापूस कंपन्यांनी बोलगार्ड (बिटी-२) बियाणे विकसीत केले होते. या बियाणाच्या कापसात बोंड आळी होवू नये, फवारणीचा खर्च वाचावा हा या मागचा उद्देश होता. सुरुवातीला काही वर्ष बिटी बियाणावर अळीचा प्रादूर्भाव कमी होता. बिटी बियाणाच्या सुरुवातीला किंमतीही अधिक होत्या. परंतु शासनाने मागील दोन वर्षात किंमतीच्या बाबतीत बंधने घालून भाव कमी केले होते.
सर्वच बियाणे कंपन्यांनी बिटी बियाणे विकसित केल्याने शेतकºयांनी वेगवेगळ्या कंपन्यांचा कापसाच्या जातीची लागवड केली होती. परंतू कापूसास पाते व बोंडे लागण्यावेळीच अळीचा प्रादूर्भाव वाढून फकही झाली होती. उर्वरीत कापूस बोंडे परिपक्व होण्याच्या वेळी सेंद्रीय अळी वाढल्याने बोंडातील कापसाला कीड लागली आहे. अळीने प्रत्येक बोंडातील अर्धा भाग खाल्ल्याने कापूस खराब निघत आहे. यामुळे शेतक-यांनी लागवड केलेले सर्वच कंपन्यांचे कापसाचे बिटी बियाणेच फसवे निघाले आहे. बीटी तंत्रज्ञानासाठी शेतक-यांना अधिकचा दर द्यावा लागतो. बोंड अळीमुळे कापूस वेचणी सोपे नसल्याने मजूर जास्तीचा भाव मागत आहे.
कापूस वेचणीच्या खर्चात दुपटीने वाढ
गत वर्षी पहिल्या कापूस वेचणीचा भाव हा ५ रुपये किलो आणि विक्रीचा भाव सहा हजार रुपये होता. या वर्षी पहिल्याच वेचणीस वेचणीचा भाव हा आठ ते दहा रुपयापर्यंत आहे. काही ठिकाणी तर दहा रुपये प्रती किलो प्रमाणे कापूस वेचणी सुरू आहे.
किडलेल्या बोंडामुळेच शेतक-यांना वेचणीसाठी दहा रुपये किलोचा मजुराला द्यावा लागत आहे. पहिल्या वेचणीलाच खरा कापूस निघत असल्यामुळे दुस-या व तिस-या वेचणीची तर बिकट अवस्था आहे. या वर्षी फसव्या बिटी बियाणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.