पलंग पालखीचे जंगी स्वागत

By Admin | Published: October 11, 2016 12:26 AM2016-10-11T00:26:06+5:302016-10-11T00:27:32+5:30

तुळजापूर : सोमवारी ‘आई राजा उदो उदोऽऽच्या’ गजरात व शेकडो देवीभक्तांसमवेत अहमदनगर येथून पालखी व पलंगाचे शहरात आगमन झाले.

Couch Palette Welcome | पलंग पालखीचे जंगी स्वागत

पलंग पालखीचे जंगी स्वागत

googlenewsNext

तुळजापूर : सोमवारी ‘आई राजा उदो उदोऽऽच्या’ गजरात व शेकडो देवीभक्तांसमवेत अहमदनगर येथून पालखी व पलंगाचे शहरात आगमन झाले. याचे शहरवासीयांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. पालखी शहरात आल्यानंतर जनकोजी भगत समाधी मंदिरस्थळी विसाव्यासाठी दिवसभर ठेवण्यात आली. या ठिकाणी हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. यावेळी पालखीवाले विजय भगत यांनी रविवारी पालखी आगळगावी मुक्कामी होती. तेथून मुक्काम करून सोमवारी सकाळी तुळजापुरात दाखल झाली. पालखीसमवेत राजू भगत, महेश भगत, जितेंद्र भगत, सचिन भगत यांच्यासह अन्य भाविक आहेत. सदरची पालखी पहाटे चार वाजता मंदिरात पोहोचेल व नंतर देवी सीमोल्लंघनाची तयारी सुरू होईल, असे भगत यांनी सांगितले. याच पालखीमधून देवीची मंदिर प्रदक्षिणा घातली जाते. तिसऱ्या माळेला भिंगार येथे पलंग व पालखी एकत्रित येतात व तेथून पुढे दोघेही वेगवेगळ्या मार्गाने तुळजापूरकडे निघतात. पलंग, कडा, आष्टी, जामखेड, भूममार्गे तुळजापुरात दाखल होते, अशी माहिती बाबुराव पलंगे यांनी दिली. पलंग हा आडेकर यांच्या निवासस्थानी विसाव्यासाठी थांबतो अशी माहिती आनंद पलंगे यांनी दिली. त्यांच्यासोबत गणेश पलंगे, उमेश पलंगे आदींसह शेकडो भाविक सोबत येतात. पलंग पालखी मार्गावर ठिकठिकाणी रंगबेरंगी रांगोळी काढून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. रात्री १२ वाजता मंदिर संस्थानच्या वतीने या दोन्हींची पूजा करून आरती करून मंदिराकडे रवानगी होते व देवीच्या सीमोल्लंघनास प्रारंभ होतो.दर्शनासाठी गर्दी : आजपासून देवीची मंचकी निद्रा सोमवारी दुपारी मंदिरात धार्मिक विधी पार पडल्यानंतर तहसीलदारांच्या हस्ते घटोत्थापन करण्यात आले. यावेळी ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता. मंगळवारपासून देवीची श्रमनिद्रा प्रारंभ होत आहे. यासाठी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथून ऋषी पंचमीला पलंग तुळजापूरसाठी निघाला होता तो आज नवमीला शहरात दाखल झाला. सदरचा पलंग घोडेगावचे ठाकूर घराणे बनविते व त्यावर कलाकुसरीचे काम करते, तर भागवत परिवार सुतारी काम करून नगरमध्ये पलंगवाले यांच्याकडे सुपुर्द करतात. त्यानंतर नगरमधील देवी मंदिरात घटस्थापना करून पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ होते.

Web Title: Couch Palette Welcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.