देश परदेश- धोकादायक पदार्थांच्या
By | Published: December 5, 2020 04:05 AM2020-12-05T04:05:09+5:302020-12-05T04:05:09+5:30
धोकादायक पदार्थांच्या यादीतून गांजाला वगळले --------------------------- युनोमध्ये भारतासह २७ देशांनी घेतला बहुमताने निर्णय ----------- नवी दिल्ली : गांजा (भांग) ...
धोकादायक पदार्थांच्या
यादीतून गांजाला वगळले
---------------------------
युनोमध्ये भारतासह २७ देशांनी घेतला बहुमताने निर्णय
-----------
नवी दिल्ली : गांजा (भांग) आणि गांजाची राळ (रेझिन) यांना फार धोकादायक पदार्थांच्या यादीतून वगळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांत बहुमताने पाठिंबा मिळाला. अमली पदार्थांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत हा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या अमली पदार्थांवरील आयोगाने बुधवारी ६३ व्या सत्रात घेतला. या निर्णयामुळे गांजाला आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमित करण्यासाठीच्या बदलांना चालना मिळेल.
अमली पदार्थांवरील १९६१ मधील एकल अधिवेशनाची अनुसूची चारमधून गांजाला हटविण्यासाठी आयोगाने निर्णय घेतला. या अनुसूचीत घातक मार्फिन, हेरॉईनसह गांजाचा समावेश केला गेला होता, असे संयुक्त राष्ट्रांनी दोन डिसेंबर रोजी जारी केलेल्या वृत्त निवेदनात म्हटले.
५९ वर्षांपासून गांजावर कठोर बंधने होती. त्यामुळे वैद्यकीय कारणांसाठी त्याचा वापर करता येत नव्हता, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले.
सीएनडीच्या ५३ सदस्यांपैकी भारत, अमेरिका आणि बहुतेक युरोपीय देशांसह २७ देशांनी गांजा व गांजाची राळ यादीतून वगळण्यासाठी हो म्हटले तर चीन, पाकिस्तान आणि रशियासह २५ देशांनी नाही म्हटले. युक्रेन अनुपस्थित होता. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी अफगाणिस्तानमधील पाकिस्तानचे राजदूत मन्सूर अहमद खान होते.
-------------------------