देशी दारूचे दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:56 PM2017-11-21T23:56:59+5:302017-11-21T23:58:23+5:30
नांदेड-हिंगोली महामार्गावरील वरूड येथील देशी दारूच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून ८८ हजारांचा माल लंपास केल्याची घटना २० नोव्हेंंबरच्या मध्यरात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरकडा : नांदेड-हिंगोली महामार्गावरील वरूड येथील देशी दारूच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून ८८ हजारांचा माल लंपास केल्याची घटना २० नोव्हेंंबरच्या मध्यरात्री घडली.
नांदेड-हिंगोली महामार्गावरील कळमनुरी तालुक्यातील वरूड येथे चंदनलाल रामलाल जैस्वाल यांचे देशी दारूचे दुकान असून २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून देशी दारूच्या ४० बॉक्स किंमत ८८ हजार रुपयांचा माल लंपास केला तर दुकानातील एलसीडी ८ हजार, एडीव्हीआर अंदाजे किंमत २५ हजार, १५ हजार रुपयांचे संगणक, १४ हजारांचे कॉनटींग मशीनचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी हिंगोली येथील शॉनपथकास पाचारण करण्यात आले होते. परंतु श्वान पथकालाही मार्ग सापडला नाही व ठस्से तज्ञ पथकानेही सर्व दुकानांची पाहणी करून ठस्से घेतले. यावरून डोंगरकडा चौकीचे जमादार संतोष नागरगोजे यांनी पंचनामा केला व चंदनलाल जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.