दावरवाडीच्या निवडणुकीत दाम्पत्याचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:06 AM2021-01-19T04:06:46+5:302021-01-19T04:06:46+5:30
दावरवाडी : ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण तेरा जागांसाठी निवडणूक झाली आहे. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाही ग्रामविकास ...
दावरवाडी : ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण तेरा जागांसाठी निवडणूक झाली आहे. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशाही ग्रामविकास पॅनलचे तेरापैकी नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारात सीमा ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर जाधव, प्रशांत देशमुख, राणी राजू नंन्नवरे, सिंधुबाई नानासाहेब एडके, अरविंद तांगडे, मुक्ताबाई शामराव तांगडे, राजेंद्र वाघमोडे, शहनाज गणी शेख या उमेदवारांचा विजय झाला आहे.
परिवर्तन ग्रामविकास महाआघाडीचे तेरापैकी चार उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारात चंद्रशेखर सरोदे, संगीता गोपाल धारे, मीनाबाई नाथा सोरमारे, प्रवीण खांडे यांचा समावेश आहे. शिवशाही ग्रामविकास पॉनलच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी जि.प. सदस्य कमलाकर एडके, माजी सरपंच प्रकाश देशमुख, मोहनराव जगताप, शामदादा तांगडे, बी.टी. तांगडे, डॉ.काकासाहेब एडके, संतोष जबडे, एकनाथ हाके, अन्नासाहेब जाधव, सोमनाथ सातपुते, रवींद्र सातपुते, विजय दिंडे, नंदू नंन्नवरे आदी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १ मध्ये चुरशीची लढत
प्रभाग क्रमांक एकमध्ये चार उमेदवार उभे होते. या ठिकाणी चांगलीच चुरशीची लढत झाली आहे. या वॉर्डात सीमा ज्ञानेश्वर जाधव व ज्ञानेश्वर जाधव या दाम्पत्याचा गावात पहिल्यांदाच विजय झाला.
छाया : दावरवाडी येथे शिवशाही ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार ग्रामपंचायत कार्यालय समोर हात उंचावून विजयी जल्लोष साजरा करताना.
दावरवाडीतील प्रभाग क्रमांक एकमध्ये भरघोस मतांनी विजयी झालेले दाम्पत्य सिमा ज्ञानेश्वर जाधव व ज्ञानेश्वर जाधव यांचा विजय झाला.