औरंगाबाद जिल्हा परिषदेत बदल्यांवरून गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:48 AM2018-05-12T00:48:28+5:302018-05-12T00:49:36+5:30
जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज पहिल्या दिवशी ३८ कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली करण्यात आली. तथापि, समुपदेशन पद्धतीनुसार कर्मचाºयांनी ‘एलसीडी’वर दाखविण्यात आलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले; परंतु रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने मागितलेले तालुके न दिल्यामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आज पहिल्या दिवशी ३८ कर्मचाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने बदली करण्यात आली. तथापि, समुपदेशन पद्धतीनुसार कर्मचाºयांनी ‘एलसीडी’वर दाखविण्यात आलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले; परंतु रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने मागितलेले तालुके न दिल्यामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी सांगितले की, ‘एलसीडी’वर तालुकानिहाय रिक्त जागा दाखविण्यात आल्या. कर्मचाºयांच्या पसंतीनुसार बदल्यांना प्राधान्य देण्यात आले; परंतु काही ठिकाणी रिक्त जागांचा समतोल राखण्यासाठी कर्मचाºयांनी मागितलेल्या जागांवर त्यांची बदली करता आली नाही. यामध्ये औरंगाबाद, गंगापूर तालुक्यांना जास्त पसंतीक्रम होता. अन्य तालुक्यांच्या तुलनेत नेमक्या याच ठिकाणी अत्यल्प रिक्त जागा असल्यामुळे त्या जागांवर बदलीने पदस्थापना देण्याचे टाळले.
आज शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत समुपदेशन पद्धतीने कर्मचाºयांची बदली करण्यात आली. यंदा विविध विभागांत कार्यरत १०२ कर्मचाºयांच्या प्रशासकीय, तर विनंतीवरून १६४ बदल्या प्रस्तावित आहेत़ बदलीची ही प्रक्रिया १५ मेपर्यंत पूर्ण होणार असून, आज सकाळपासून जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात समुपदेशनची प्रक्रिया राबविण्यात आली.
सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सामान्य प्रशासन, दुपारी १ ते ४.३० वाजेपर्यंत महिला व बालविकास विभाग, तर ४.३० वाजेपासून पुढे वित्त विभागाच्या बदल्या करण्यात आल्या.
सोमवारी १४ मे रोजी शिक्षण विभाग, पशुसंवर्धन आणि कृषी विभाग, तर १५ मे रोजी बांधकाम, पाणीपुरवठा, सिंचन विभाग तसेच आरोग्य, पंचायत विभागांतील बदलीपात्र कर्मचाºयांची समुपदेशन पद्धतीने बदली केली जाणारआहे.
संवर्गनिहाय झालेल्या बदल्या
आज सामान्य प्रशासन विभागांतर्गत सहायक प्रशासन अधिकारी- १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी-४, वरिष्ठ सहायक- ५ आणि कनिष्ठ सहायकांच्या- १८, एकात्मिक बालविकास विभागातील पर्यवेक्षिकांच्या ७, वित्त विभागातील कनिष्ठ लेखाधिकार- २ आणि कनिष्ठ सहायक (लेखा)- १, अशी एकूण ३८ कर्मचाºयांची बदली करण्यात आली.
आंतरजिल्हा बदलीने ३४४ शिक्षकांपैकी लातूर जिल्ह्यात जाणारे १३ शिक्षक सोडले, तर ३३१ शिक्षकांना काल कार्यमुक्त करण्यात आले. उद्या शनिवारी राज्यस्तरावरून जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश येण्याची शक्यता मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी वर्तवली आहे.