दुकान फोडणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद
By Admin | Published: May 7, 2017 12:06 AM2017-05-07T00:06:20+5:302017-05-07T00:09:14+5:30
मुरूड : येथील शिवाजी चौकात असलेली आठ दुकाने गुरूवारी मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती़ दरम्यान, दुकान फोडणारे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरूड : येथील शिवाजी चौकात असलेली आठ दुकाने गुरूवारी मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती़ दरम्यान, दुकान फोडणारे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून, त्यांच्या अटकेसाठी मुरूड पोलिसांचे पथक रवाना झाले आहे़
लातूर तालुक्यातील मुरूड येथे गुरूवारी मध्यरात्री शिवाजी चौकातील आठ दुकाने चोरट्यांनी फोडली होती़ याप्रकरणी रामदास हणमंतराव नाडे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी मुरूड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान, पोलिसांनी शिवाजी चौकातील काही सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुकान फोडणारे चोरटे कैद झाल्याचे आढळून आले़ हे सीसीटीव्ही फुटेज मुरूड पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या फुटेजमध्ये कैद असलेल्या चोरट्यांची पोलिसांना ओळख पटली असून, त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे़
मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील चोरट्यांनी बीअरबार फोडून जवळपास अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती़ या प्रकरणातील उर्वरित १० आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत़ यातील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पळसप येथून ताब्यात घेतले होते़ त्यानंतर दोन आठवड्यांनी पुन्हा मुरूडमध्ये दुकान फोडीची घटना घडली़ सहा महिन्यापूर्वी मुरूडमध्ये दुकान फोडीची घटना घडली होती़ सातत्याने घडफोडी आणि चोरीच्या घटना घडत असल्याने व्यापारी, नागरिकांत भीतीचे वातावरण आहे़