फटाका विक्रेत्यांची घालमेल सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 06:22 PM2018-10-29T18:22:54+5:302018-10-29T18:23:06+5:30

वाळूज महानगर : दिवाळी सण तोंडावर आला असून, वाळूजमहानगरात फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी अटीची पूर्तता करताना विक्रेत्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे फटका विक्रेत्यांची घालमेल सुरु असून, व्यवसाय करावा की नाही, या निर्णयाप्रत विके्रते आले असल्याचे दिसून येत आहे.

cracker vendors are in confusion | फटाका विक्रेत्यांची घालमेल सुरु

फटाका विक्रेत्यांची घालमेल सुरु

googlenewsNext

वाळूज महानगर : दिवाळी सण तोंडावर आला असून, वाळूजमहानगरात फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी अटीची पूर्तता करताना विक्रेत्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे फटका विक्रेत्यांची घालमेल सुरु असून, व्यवसाय करावा की नाही, या निर्णयाप्रत विके्रते आले असल्याचे दिसून येत आहे.


वाळूजमहानगर परिसरात दरवर्षी दिवाळी सणाच्या काही दिवस अगोदर रांजणगाव, वाळूज, सिडको वाळूजमहानगर आदी ठिकाणी फटका बाजार भरतो. दिवाळीचा पगार व बोनसमुळे कामगारांबरोबर नागरिकही फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. यातून विक्रेत्यांनाही दोन पैसे पदरी पडत असतात. त्यामुळे या परिसरातील फटाके विक्रेते दसऱ्यानंतर फटाक्याची आॅर्डर मोठ्या विक्रेत्यांना देतात.

या भागातील बहुताश विक्रेते जळगाव, राहुरी, अहमदनगर, नाशिक व औरंगाबाद येथील विक्रेत्यांना आॅर्डर देतात. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी शहरात फटाके बाजाराला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेमुळे धडा घेत पोलीस प्रशासनातर्फे गतवर्षीपासून फटाका बाजार थाटण्यापूर्वी विक्रेत्यांवर कडक अटी लादण्यास सुरुवात केली आहे.

यात दुकाने नागरी वसाहतीपासून दूर थाटणे, जागा मालकाचे जागा हक्काबाबतचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र, नियोजित जागेचा नकाशा, अग्निशामक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, महावितरणच्या विद्युत निरीक्षक यांचे विद्युतीकरण योग्यता प्रमाणपत्र, संबधित पोलिस ठाण्याचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, वरिष्ठ पोलीस अधिकाºयाचे ना हरकत, दोन दुकानांत पुरेसे अंतर ठेवणे, फटाका बाजाराजवळ अग्निरोधक यंत्रणा उभारणे, पाण्याचे टँकर ठेवणे आदी अटी पोलीस प्रशासनाकडून ठेवण्यात आलेल्या आहेत.

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सिडको वाळूजमहानगर परिसरात मोकळ्या भूखंडावर फटाका स्टॉल सुरु करण्यासाठी व्यवसायिकांनी परवानगी मागितली आहे. नियम व अटीची पूर्तता करणाºयांना दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.


कडक अटीमुळे विक्रेत्यांत नाराजी
फटाके विक्रीची दुकाने थाटण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विक्रेत्यांना अटी व परवानगीचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या अटींची पूर्तता करताना फटका विक्रेत्याची दमछाक होत आहे. या अटी व शर्थीमुळे दिवाळीत तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्रीची दुकाने थाटुन व्यवसाय करणाºया विक्रेत्यात नाराजीचा सूर उमटत आहे.

Web Title: cracker vendors are in confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.