जिल्हा रुग्णालयात सुविधा निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:59 PM2017-11-21T23:59:46+5:302017-11-22T00:00:02+5:30
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध गैरसोयींच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध गैरसोयींच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयावर जिल्ह्यातील १५ लाख लोकसंख्येचा भार आहे. मात्र त्यासाठी एकच सोनोग्राफी मशिन आहे. तीही बºयाचदा बंदच असते. प्रसुतीच्या रुग्णांसाठीही तिचा अनेकदा वापर होणे अवघड ठरते. शिवाय गरोदर माता व बाल संगोपनासाठी शासन विविध कार्यक्रम आखत असले तरीही जिल्हा सामान्य रुग्णालयात एकही महिला स्त्रीरोग तज्ज्ञ नाही. त्यामुळे येथून अनेक महिलांना नांदेडला प्रसुतीसाठी पाठविले जाते. तर आॅक्सिजन व इतर सुविधा नसल्याचे सांगून दुसºयांदा सिझरच्या रुग्णाला तर थेटच नांदेडचा रस्ता दाखविला जातो. यात मोठा भूर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे किमान स्त्रीरोग तज्ज्ञ व सोनोग्राफी तज्ज्ञ महिला डॉक्टर नेमाव्यात, एमआरआयची सुविधा उपलब्ध करून द्यावी, किरकोळ शस्त्रक्रियांसाठीचे रुग्ण नांदेडला पाठविणे बंद करावे, शासकीय रुग्णालयात इतरही अनेक सोयीसुविधांची आवश्यकता आहे. या सुविधा वाढवाव्यात अशा अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. यासाठी यापूर्वीही निवेदने दिली होती. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणत्याच रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
यात आंदोलनस्थळी स.सलाहोद्दीन हाशमी, पठाण मोहसीन खान, पठाण हसन खान, शे.कलीम शे.मौला बागवान, पठाण जुबेर खान, शेख उस्मान टेलर, शेख मुस्ताक आदींची उपस्थिती होती.