समांतरचे नवीन डिझाईन तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:19 PM2019-04-30T23:19:32+5:302019-04-30T23:20:21+5:30

समांतर जलवाहिनी योजनेचे डिझाईन मनपाने तब्बल १२ वर्षांपूर्वी तयार केले होते. २०२५ मध्ये शहराची संभाव्य लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार केली होती. शहर झपाट्याने वाढत आहे. सातारा-देवळाईसारखा महत्त्वाचा भागही आता मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे.

Create a new design for parallel | समांतरचे नवीन डिझाईन तयार करा

समांतरचे नवीन डिझाईन तयार करा

googlenewsNext
ठळक मुद्देविभागीय आयुक्त : पाणी प्रश्नावर भाजप नगरसेवकांनी घेतली भेट


औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजनेचे डिझाईन मनपाने तब्बल १२ वर्षांपूर्वी तयार केले होते. २०२५ मध्ये शहराची संभाव्य लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार केली होती. शहर झपाट्याने वाढत आहे. सातारा-देवळाईसारखा महत्त्वाचा भागही आता मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य समांतर जलवाहिनी योजनेचे नवीन डिझाईन तयार करा, असे आदेश आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपाला दिले.
शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक वॉर्डांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत महापालिकेला पाण्याचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे आज भाजपा नगसेवकांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेतली. आयुक्तांनी प्रथम कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याशी फोनवर संपर्क साधून समांतरची सद्य:स्थिती जाणून घेतली. त्यानंतर विधि सल्लागार अपर्णा थेटे यांच्याकडून कादेशीर माहिती घेतली. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांच्यासोबतही समांतर जलवाहिनीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. म्हैसेकर यांनी नमूद केले की, मुळात ही योजना १२ वर्षांपूर्वी तयार केली होती. योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत तिचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे जुनी योजना आज राबवून काहीच उपयोग होणार नाही. महापालिकेलाही यापूर्वी नवीन डिझाईन तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शासनाकडे नवीन योजनेचा प्रस्ताव पाठविल्यास त्यात काहीतरी मार्ग काढता येईल. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी तरी टाकता येईल. या कामासाठी स्वतंत्र टेंडर काढता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येईल. सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविणे अशक्य आहे. नवीन योजनेत सातारा देवळाईसह २०४५ किंवा २०४० ची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबवावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रेकर यांनी मनपा अधिकाऱ्यांना नवीन योजनेचे डिझाईन तयार करण्याचे आदेश दिले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, माजी महापौर बापू घडमोडे, प्रमोद राठोड, दामूअण्णा शिंदे, मनोज गांगवे, माधुरी अदवंत आदींची उपस्थिती होती.

Web Title: Create a new design for parallel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.