योग्य गुंतवणूक करीत आयुष्याला संपूर्ण सुरक्षा चक्र निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:02 AM2021-04-23T04:02:01+5:302021-04-23T04:02:01+5:30

: आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अमलात आणा ७ बाबी औरंगाबाद : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. यंदा नवीन गुंतवणूक ...

Create a whole life cycle by making the right investments | योग्य गुंतवणूक करीत आयुष्याला संपूर्ण सुरक्षा चक्र निर्माण करा

योग्य गुंतवणूक करीत आयुष्याला संपूर्ण सुरक्षा चक्र निर्माण करा

googlenewsNext

: आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच अमलात आणा ७ बाबी

औरंगाबाद : नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. यंदा नवीन गुंतवणूक कशात करायची असा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला असेल. मुळात गुंतवणूक कशासाठी व कशात करायची, गुंतवणुकीत आपले नुकसान तर होणार नाही ना, कोणी फसविणार तर नाही ना अशा ‘ए टू झेड’ प्रश्नांचा मनात काहूर माजला असेल.

मात्र, तुम्ही जर आपल्या मनात पक्के ठरविले की, यंदा गुंतवणूक करायची तर तुम्हाला योग्य व अचूक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार आहेतच. यामुळे चिंता सोडा व भविष्यातील गरजा ओळखून गुंतवणूक करा. आपल्या आयुष्याभोवती संपूर्ण आर्थिक सुरक्षा चक्र निर्माण करा. किती संकटे आली तरी हे सुरक्षा चक्र भेदून ते तुमची आर्थिक बाजू कोलमडू देणार नाहीत.

मुळात गुंतवणुकीचा विचार मनात कधी येतो. आर्थिक वर्ष अखेरीस म्हणजे मार्च महिना आला की, दीड लाखाची कर सवलत मिळविण्यासाठी म्हणजेच आयकर वाचविण्यासाठी आयकरदात्यांची धावपळ सुरू होते. तुमची ती धावपळ होऊ नये यासाठी आपल्या गरजेनुसार आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिल- मे महिन्यांच्या दरम्यान गुंतवणूक करणे हे सर्वांत योग्य होय, असा सल्ला आनंद इन्व्हेस्टमेंटचे संचालक व गुंतवणूक सल्लागार ऋषिकेश कुंकूलोळ यांनी दिला.

गुंतवणुकीसाठी त्यांनी खास गुंतवणूकदारांना ७ बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

१) आपल्या करबचतीच्या पर्यायाचे नियोजन करा

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाल्याबरोबर एप्रिल महिन्यापासून टॅक्स सेव्हिंग करण्यास सुरुवात करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या चार्टर्ड अकाउंटट सोबत बैठक ठरवा. आपला पगार किंवा व्यवहारातील उत्पन्न, खर्च याचा लेखाजोखा त्यांच्या समोर मांडा.

त्याचा अभ्यास करून चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीलाच कर बचतीच्या पर्यायाने नियोजन करून देईल.

( जोड )

Web Title: Create a whole life cycle by making the right investments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.