क्रेडाईच्या नवीन कार्यकारिणीचा शनिवारी पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:10 AM2017-09-01T01:10:19+5:302017-09-01T01:10:19+5:30

बांधकाम व्यावसायिकांची संघटना कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया (क्रेडाई) च्या स्थानिक शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शनिवारी (दि.२) सायंकाळी ७ वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

CREDAI's new executive ceremony will be held on Saturday | क्रेडाईच्या नवीन कार्यकारिणीचा शनिवारी पदग्रहण सोहळा

क्रेडाईच्या नवीन कार्यकारिणीचा शनिवारी पदग्रहण सोहळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकांची संघटना कॉन्फेडरेशन आॅफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन आॅफ इंडिया (क्रेडाई) च्या स्थानिक शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शनिवारी (दि.२) सायंकाळी ७ वाजता हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यकारिणीचे नूतन अध्यक्ष रवी वट्टमवार, तर सचिव आशुतोष नावंदर आहेत, अशी घोषणा महाराष्ट्र क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा यांनी केली.
उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा, नितीन बगाडिया, विकास चौधरी, भास्कर चौधरी, संग्राम पटारे, कोषाध्यक्ष सुनील बेदमुथा, सहसचिव रामेश्वर भारुका, संभाजी अतकरे, सहकोषाध्यक्ष अनिल अग्रहारकर, नीलेश अग्रवाल, समन्वयक अखिल खन्ना, जनसंपर्क विजय सक्करवार, संचालक गोपेश यादव, पंजाबराव तौर, रोहित सूर्यवंशी, प्रशांत अमिलकंठवार, संदेश झांबड, बालाजी येरावार यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारिणी दोन वर्षांसाठी कार्यरत राहील. जबिंदा यांनी सांगितले की, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, खा.चंद्रकांत खैरे, महापौर भगवान घडामोडे, आ.संजय सिरसाट, आ. सुभाष झांबड, आ.अतुल सावे, आ. सतीश चव्हाण, आ. इम्तियाज जलील, क्रेडाईचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, युथविंग समन्वयक अर्चित भारुका, वूमन्स विंग समन्वयक दीपा पटारे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जबिंदा यांनी
केले.

Web Title: CREDAI's new executive ceremony will be held on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.