साठेबाजी करणाऱ्या १५ ग्रामस्थांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:02 AM2017-07-18T01:02:37+5:302017-07-18T01:04:41+5:30

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील गोंदी येथे १४ जुलै रोजी विभागीय आयुक्तांच्या पथकाने गोदापात्रातील अवैध वाळू साठ्यांवर छापे टाकून एक कोटी रुपयांचा वाळूसाठा जप्त केला होता

Crime against 15 people stabbering | साठेबाजी करणाऱ्या १५ ग्रामस्थांवर गुन्हा

साठेबाजी करणाऱ्या १५ ग्रामस्थांवर गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील गोंदी येथे १४ जुलै रोजी विभागीय आयुक्तांच्या पथकाने गोदापात्रातील अवैध वाळू साठ्यांवर छापे टाकून एक कोटी रुपयांचा वाळूसाठा जप्त केला होता. याप्रकरणी साठेबाजी करणाऱ्या पंधरा ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, साठेबाजीवर अभय देणाऱ्या दोन महसूल कर्मचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्तावही पाठविण्यात आला.
गोंदी येथे अनेक दिवसांपासून गोदापात्रातून सर्रास सुरू होता. अनेक दिवसांपासून वाळूमाफियांवर मोठी कारवाई करण्यास अधिकारी धजत नसे त्यामुळे वाळूमाफियांचे मनोबल वाढले होते.
विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर व तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांच्या नेतृत्वाखाली जम्बो पथक नेमले. त्यांना या भागात कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या पथकाने १४ जुलै रोजी गोंदी येथे छापा टाकून वाळूसाठा जप्त करण्यात आला. साठेबाजीला अभय देणाऱ्या तलाठ्यांविरुद्ध उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तर मंडळ अधिकारी सोनवणे यांच्याविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्याचे तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांनी सांगितले.
महसूल विभागाप्रमाणे पोलीस अधीक्षक पोलीस कर्मचाऱ्यांविरूध्द कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले. या वाळूचे साठेबाजी करणारे, पंकज सोळुंके, शेखर सखाराम सोळुंके, गजानन सोळुंके, सुयोग सोळुंके, विजय सोळुंके, सदा शिंदे, दादाहरी केकाण, अंकुश जाधव, जमील शेख, विठ्ठल सोळुंके, कल्याण काळे, शरद सोळुंके, कृष्णा वाघमारे, गंगूबाई बैरागी यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Crime against 15 people stabbering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.