विद्यार्थिनीला पळवून नेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:16 IST2018-12-13T00:16:53+5:302018-12-13T00:16:59+5:30
येथील एक विद्यार्थिनीला दोन तरुणांनी पळवून नेल्याची घटना घडली.

विद्यार्थिनीला पळवून नेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
फर्दापूर : येथील एक विद्यार्थिनीला दोन तरुणांनी पळवून नेल्याची घटना घडली. येथील एक १७ वर्षीय तरुणी पेपर देण्यासाठी कॉलेजमध्ये गेली होती. पेपर सुटल्यावर तिचे वडील तिला घेण्यासाठी आले, तेव्हा राहुल चंद्रकांत पांढरे (२३) व बाल्या घाटे (१७, दोन्ही. रा. पहूर) यांनी तिला वडीलांसमोर गाडीवर बसवून पळवून नेले. त्या युवतीच्या वडीलांनी फर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे, कांबळे, ज्ञानेश्वर सरताळे हे करीत आहेत.