कामगारावर चाकूहल्ला करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:03 AM2021-04-14T04:03:06+5:302021-04-14T04:03:06+5:30
अजय राजेंद्र टाक (३३, रा. बजाजनगर) हे वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत कंत्राटी कामगार आहेत. त्यांच्यासोबत काम करणारा सचिन परदेशी ...
अजय राजेंद्र टाक (३३, रा. बजाजनगर) हे वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत कंत्राटी कामगार आहेत. त्यांच्यासोबत काम करणारा सचिन परदेशी (२२, रा. हर्सूल परिसर) हा सतत टाक यांची थट्टा- मस्करी करीत होता. सुपरवायझरकडे तक्रार करणार असल्याचे ९ एप्रिलाला टाक यांनी सचिनला सांगितले होते. त्यावर सचिनने त्यांना मारण्याची धमकी दिली. अजय टाक १० एप्रिल रोजी कंपनीतून सुदर्शन काळे व विक्रम काळे यांना सोबत घेऊन दुचाकीवरून घरी चालले होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास एफडीसी चौकात दुचाकीवरून आलेल्या सचिनने त्यांची दुचाकी अडवली. काही क्षणातच सचिनने त्यांच्यावर चाकूने वार केले. यात अजय टाक हे गंभीर जखमी झाले. सुपरवायझर रवी राठोड व धनंजय यांनी गंभीर टाक यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अजय टाक यांच्या तक्रारीवरून आरोपी सचिन परदेशी याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपी सचिन परदेशी यास न्यायालयात हजर केले असता त्यास १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.