बालविवाह करणाऱ्या नवरदेवासह नातेवाइकांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:05 AM2021-05-21T04:05:07+5:302021-05-21T04:05:07+5:30
१६ मे रोजी मिसारवाडी येथे बालविवाह होणार असल्याची माहिती चाइल्डलाइनमार्फत जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर अधिकाऱ्यांचे एक पथक ...
१६ मे रोजी मिसारवाडी येथे बालविवाह होणार असल्याची माहिती चाइल्डलाइनमार्फत जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना मिळाली. यानंतर अधिकाऱ्यांचे एक पथक तेथे धडकले. नवरदेव- नवरी आणि त्यांच्या नातेवाइकांना बोलावून घेतले. यावेळी त्यांनी हा बालविवाह नसून केवळ साखरपुडा कार्यक्रम असल्याचे लिहून दिले होते. पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी मिसारवाडीत झालेल्या या कार्यक्रमाची छायाचित्रे मिळविली असता नवरदेव- नवरीला हळद लावणे, मुंडावळी बांधून देवासमोर बसविणे, मुलीला शुभ्र साडी नेसायला देणे आणि नवरदेव नव्या कपड्यात असल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांनी वधूचा बालकल्याण समितीसमोर जबाब नोंदविला. यानंतर हा बालविवाह करण्यात आल्याच्या निष्कर्षावर अधिकारी पोहोचले. याविषयी बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश सांडू पुंगळे यांनी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा आबूज याप्रकरणी तपास करीत आहेत.