पंढरपुरात मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:04 AM2021-04-20T04:04:11+5:302021-04-20T04:04:11+5:30
सुजाता शाम शितोळे (२१, रा. पंढरपूर) ही रविवारी दुपारी १.३०च्या सुमारास घरात अभ्यास करत होती. यावेळी घराशेजारी राहणाऱ्या ...
सुजाता शाम शितोळे (२१, रा. पंढरपूर) ही रविवारी दुपारी १.३०च्या सुमारास घरात अभ्यास करत होती. यावेळी घराशेजारी राहणाऱ्या आलमनूर पठाण व शन्नू पठाण या दोघी शितोळे कुंटुबियांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करत होत्या. यामुळे सुजाता शितोळे समजावण्यासाठी गेली असता, आलमनूर व शन्नू पठाण यांनी तिच्याशी वाद घातला. यावेळी आलमनूर हिने सुजाताच्या आईला मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
नवीन जलवाहिनीचे काम सुरु
वाळूज महानगर : पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेले राजस्वप्नपूर्ती व आदर्श कॉलनीत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सिडको प्रशासनाने सुरु केले आहे.
राजस्वप्नपूर्ती, आदर्श कॉलनी व म्हाडा कॉलनीला अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या वसाहतींमधून सोलापूर - धुळे महामार्ग गेल्याने नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम अनेक दिवस रखडले होते. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर नवीन जलवाहिनी टाकण्यास मंजुरी मिळाली होती. मात्र, गतवर्षी जूनमध्ये झालेल्या पावसात जुनी जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यानंतर सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘सिडको’कडे पाठपुरावा केला होता. यानंतर सिडको प्रशासनाने निधी उपलब्ध झाल्यानंतर हे काम सुरु केले आहे.