लाच मागणाऱ्या वारंट अंमलदाराविरुद्ध गुन्हा

By Admin | Published: September 21, 2014 12:27 AM2014-09-21T00:27:56+5:302014-09-21T00:37:44+5:30

नांदेड: लाच मागणाऱ्या वारंट अंमलदारासह एका पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध कंधार ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

Crime against Warrant Executives who seek bribe | लाच मागणाऱ्या वारंट अंमलदाराविरुद्ध गुन्हा

लाच मागणाऱ्या वारंट अंमलदाराविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची उद्या, २१ सप्टेंबर रोजी होणार आहे.
बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे अनुसूचित जाती या संवर्गासाठी राखीव असून, जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचा अध्यक्ष होणे जवळपास निश्‍चित आहे. काँग्रेसकडे अलका चित्रांगण खंडारे या एकमेव जि.प.सदस्य या प्रवर्गातील असल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड होण्याच्या घोषणाच बाकी आहे. तर उपाध्यक्षपदासाठी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादीचे जि.प.सदस्यांशी चर्चा केली.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात १0 जि.प.सदस्य संख्या असून, यात राष्ट्रवादी काँग्रेस ४, भाराकाँ ३, अपक्ष, सेना आणि मनसे असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसच्या माया चव्हाण या एकमेव महिला सभापती आहेत. तर मतदारसंघात मलकापूर पांग्रा, सोनुशी-वर्दडी, सिनगाव जहागीर, मेरा खु. ही चार जि.प.सर्कल राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यात दिनकरराव देशमुख, अरुणा मधुकर गव्हाड, शारदा रमेश दंदाले आणि पांडुरंग खेडेकर हे जि.प.सदस्य आहेत. चालू टर्ममध्ये एकाही सदस्याला जि.प.मध्ये सभापतीपद मिळाले नव्हते, त्यामुळे एक उपाध्यक्ष आणि एक सभापती पद मिळावे, यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रथम उपाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावल्या जात आहे.
जि.प. निवडणुकीत दिनकरराव देशमुख यांनी मलकापूर पांग्रा जि.प.सर्कलमधून सर्वाधिक ९५00 म ताधिक्य मिळविले होते. तर दुसरे मेरा खु. जि.प.सर्कलमधील पांडुरंग खेडेकर हेही प्रबळ दावेदार आहेत. मागील टर्ममध्ये एकही पद राकॉंला न मिळाल्याने यावेळी उपाध्यक्ष पद या मतदार संघात कसे मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फिल्डींग लावली जात असल्याचे दिसत आहे.

Web Title: Crime against Warrant Executives who seek bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.