महिला शिपायावर गुन्हा

By Admin | Published: November 18, 2015 11:54 PM2015-11-18T23:54:36+5:302015-11-19T00:26:34+5:30

अंबाजोगाई : जिल्हाधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीचा शिपाई पदाचा आदेश तहसील कार्यालयात सादर करून एक महिला शासकीय सेवेत रुजू झाली.

Crime against women soldier | महिला शिपायावर गुन्हा

महिला शिपायावर गुन्हा

googlenewsNext

 

अंबाजोगाई : जिल्हाधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरीचा शिपाई पदाचा आदेश तहसील कार्यालयात सादर करून एक महिला शासकीय सेवेत रुजू झाली. ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच तिच्याविरूध्द शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, ती महिला फरार झाली आहे.
कांचन दिलीप गाडे असे त्या बनावट महिला शिपायाचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील जळगाव येथील कांचन गाडे ही महिला ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या बनावट स्वाक्षरीचा शिपाई पदाचा रूजू होण्याचा आदेश घेऊन अंबाजोगाई येथील तहसील कार्यालयात दाखल झाली. तो अर्ज सादर करून कांचन सेवेत रूजू झाली. कांचन हिने रुजू होण्यासाठी आणलेला आदेश, त्यातील संदर्भ व इतर बाबी संशयास्पद वाटल्याने नायब तहसीलदार बाळकृष्ण वांजरखेडकर यांनी हा प्रकार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर कांचन गाडे हिने दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर आदेश व कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. या प्रकरणामुळे कांचनची चौकशी केली असता, हा सर्व बनावट प्रकार महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आला.
हा प्रकार अंगलट येणार असल्याचे समजताच सदरील महिला फरार झाली आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार बाळकृष्ण वांजरखेडकर यांनी बुधवारी अंबाजोगाई शहर ठाण्यात कांचन गाडेविरूध्द फिर्याद दाखल केली.
बनावट दस्तऐवज, खोट्या स्वाक्षऱ्या करून प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांचन गाडे हिने जिल्हाधिकारी यांचा बनावट आदेश आणून रूजू झाली. मात्र, रुजू होताना तिने बनावट कागदपत्रे दिली होती.
कांचन हिने ही बनावट कागदपत्रे आणली कोठून ? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. यासह जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आदेशावर सही कोणी केली ? हाही तपासाचा भाग आहे.
या प्रकरणामुळे एकूणच नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रॅकेट सक्रीय असल्याचा संशय
महसूल प्रशासनामध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या सहीचे शिक्के तसेच त्यांच्या हुबेहूब सह्या मारणारे दलाल असल्याचे यापूर्वी समोर आले आहे.
मात्र, कांचन गाडे हिने जो आदेश आणलेला आहे त्यावर जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही असल्याने इतर कोणते रॅकेट सक्रीय झाले आहे काय ? याचा तपास करणे आवश्यक आहे. गाडेची तपासणी केल्यानंतर सर्व बाबी समोर येतील.(वार्ताहर)

Web Title: Crime against women soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.