चोरीप्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:04 AM2021-06-03T04:04:47+5:302021-06-03T04:04:47+5:30

वैजापूर : तालुक्यातील चोर वाघलगाव येथील दुकानातून संगणक, प्रिंटर, लॅमिनेशन मशीन, बॅटरी, इन्व्हर्टर असा सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ...

Crime Branch arrests three in burglary case | चोरीप्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना केले जेरबंद

चोरीप्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना केले जेरबंद

googlenewsNext

वैजापूर : तालुक्यातील चोर वाघलगाव येथील दुकानातून संगणक, प्रिंटर, लॅमिनेशन मशीन, बॅटरी, इन्व्हर्टर असा सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दिनेश खरात (२८), बाळू खरात (३०) व भाऊसाहेब निगुट (३५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तिघेही चोर वाघलगाव येथील राहणार आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेल्या मालासह वापरलेले वाहन असा २ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. रवींद्र त्रिभुवन यांनी २९ मे च्या रात्री ही चोरी झाल्याची तक्रार दिल्यानंतर वीरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक गणेश राऊत, हेड कॉन्स्टेबल विक्रम देशमुख, राजू खरात, पोलीस नाईक वाल्मीक निकम, संजय भोसले, ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे, योगेश तरमाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. तपासात या तिघांचा चोरीत हात असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना बेड्या ठोकल्या गेल्या.

------

फोटो : चोरी प्रकरणातील तीन आरोपींसोबत गुन्हे शाखेचे पथक.

020621\save_20210602_173252.jpg

चोरीप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमाल सह दाखवताना पोलीस निरीक्षक भागवत फुंदे व इतर

Web Title: Crime Branch arrests three in burglary case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.