शौचालयाचे बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांवर फौजदारी कारवाई !
By Admin | Published: May 27, 2017 12:26 AM2017-05-27T00:26:56+5:302017-05-27T00:32:04+5:30
लातूर : लाभार्थ्यांनी मनपा प्रशासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार मनपाच्या क्षेत्रिय अभियंत्यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दाखल केली
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : शहरातील साळे गल्ली, अन्सार नगर, म्हैसूर कॉलनी, ताजोद्दीन बाबा नगर, बलदवा नगर, न्यू बरकत नगर, गाझीपुरा, सिद्घेश्वर नगर, लाड गल्ली, हत्ते नगर येथील एकूण २४ लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी सहा हजारांचे अुनदान गेल्या वर्षभरापूर्वी उचलले आहे. मात्र, हे बांधकाम अद्यापही पूर्ण केले नाही. याबाबत लाभार्थ्यांनी मनपा प्रशासनाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी तक्रार मनपाच्या क्षेत्रिय अभियंत्यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अनुदान उचलूनही सौशालयाचे बांधकाम न करणाऱ्या एकूण २४ लाभार्थ्यांवर कारवाई होणार आहे.
लातूर शहर महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय मंजूर करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांना महापालिकेने अनुदानाचा पहिला हप्ता म्हणून सहा हजारांचे अनुदान दिले आहे. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटला तरी अद्याप २४ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केले नाही. याबाबत क्षेत्रिय अभियंत्यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात संबंधित लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, यासाठी २५ मे रोजी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये कैलाश राजाराम कांबळे, सुरज कैलास कांबळे (न्यू बरकत नगर), यास्मीन युनूस शेख (गाझीपुरा), शेख महेबूब इमामसाब, शेख मुजावर उस्मान (न्यू गाझीपुरा), अनिल यशवंत आयवळे, राणी राजेंद्र कदम (बरकत नगर), बळीराम दामोदर ससाणे (सिद्घेश्वर नगर), वसिम बाबुमियाँनदाफ (लाड गल्ली), शिवगंगा विश्वनाथ येरटे (हत्ते नगर), विजय श्रीरंग कांबळे (बौद्घ नगर), रशिद रौफ शेख (साळे गल्ली), अख्तरबी अमीनसाब बागवान (अन्सार नगर), सुरय्या बाबू पठाण, सत्तार महेबूब शेख, फातेमाबी आयुबखाँपठाण, जैबुनीसा रशिद शेख, मलाबी शरफोद्दीन शेख (म्हैसूर कॉलनी), गफार अहेमद बागवान, खुर्शिदबी निजामोद्दीन बागवान (ताजोद्दीन बाबा नगर), अभिमान श्रीरंग कांबळे, नागसेन महादेव घोडके (बौद्घ नगर) आणि सहदेव दत्तात्रय वाघमोडे (मलदवा नगर) आदी लाभार्थ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.