गुन्हे शाखेची कामगिरी विभागात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:58 AM2017-09-27T00:58:31+5:302017-09-27T00:58:31+5:30
विविध गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणत जालना पोलिसांची कामगिरी विभागात अव्वल राहिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्थानिक गुन्हे शाखेने खबरी नेटवर्कचा चांगला वापर करून गत आठ महिन्यांमध्ये चोरी, घरफोडी, दरोड्याचे विविध गुन्हे उघडकीस आणले आहेत. चोरीस गेलेला तीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विविध गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणत जालना पोलिसांची कामगिरी विभागात अव्वल राहिली आहे.
औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी नुकतीच औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची बैठक घेतली. यात जालना पोलिसांचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पोलीस महानिरीक्षकांनी आवर्जुन उल्लेख केल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी खबरी नेटवर्कचा गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी प्रभावी वापर केला आहे. गुन्हे शाखेने १ जानेवारी ते ८ सप्टेंबरपर्यंत जबरी चोरीचे सहा, घरफोडीचे २२, चोरीचे २४ तर दरोड्याचे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. मागील वर्षी हे प्रमाण ५० पेक्षा कमी होते. शहरी व ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे. तसेच अवैध दारू विक्री करणाºयांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. सहा महिन्यांमध्ये दारूबंदी व जुगाराच्या ११० कारवाया करण्यात आल्या आहेत. मागील आठ महिन्यांमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवायांमध्ये दोन कोटी ९६ लाख २३ हजार १८३ रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेने जप्त केला आहे. गत वर्षीच्या तुलनेत जप्त मुद्देमालाचा आकडा सुमारे ७० लाखांनी अधिक आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना राज्यात घरफोड्या करणाºया आंतरराज्य (पान २ वर)