गुन्हेगारी घटल्याची आकडेवारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:00 AM2017-12-20T01:00:43+5:302017-12-20T01:00:52+5:30

वाढत्या शहरासह गुन्हेगारीदेखील वाढली होती; परंतु गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्याचे प्रमाण घटल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

 Criminal decline declares statistics | गुन्हेगारी घटल्याची आकडेवारी जाहीर

गुन्हेगारी घटल्याची आकडेवारी जाहीर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वाढत्या शहरासह गुन्हेगारीदेखील वाढली होती; परंतु गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्याचे प्रमाण घटल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.
पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तयार केलेल्या उपायोजनांचा फायदा होऊन तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारीचा आलेख खालावल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी म्हटले आहे.
गतवर्षी दरोड्याच्या १८ घटना घडल्या होेत्या. यंदा ७ गुन्हे दाखल आणि ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ४३ टक्के गुन्हे घटले आहेत. जबरी चोरीच्या २९५ घटना असून, यंदा १४१ प्रकार समोर आले असून, ११५ उघडकीस आले आहेत. १५४ ने गुन्हे घटले आहेत. सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा लावल्याने संवेदनशील भागात अधिक परिणामकारक ठरले आहे. घरफोडीच्या ३२७ घटनांची नोंद होती. यंदा १५२ प्रकार घडले आहेत. १७५ ने घरफोडीचे प्रकार घडले असून, सर्व घटनांचा विचार केला असता ८५३ गुन्ह्यांची घट झाली असून, गतवर्षी ते २,३५६ नोंद होती. यंदा १,४९३ पर्यंत नियंत्रण आणले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पोलीस अधिकाºयांचीदेखील मोठी मदत होत आहे. खुनाच्या गुन्ह्यातदेखील ४५ टक्के घट असून, दुखापतीच्या प्रकारात ११ टक्के घट झाली आहे. सरकारी नोकरावर हल्ल्याचे प्रकार २६ टक्क्यांनी घटले असून, महिलावरील अत्याचारांत ७, तर बलात्काराच्या घटनांत १३ टक्के घट झाली आहे. मंगळसूत्र चोरी ५२ टक्क्यांनी कमी झाली आहे. सीसीटीव्ही व पोलिसांच्या गस्तीचा फायदा झाला आहे. अजूनही या गुन्ह्यात अधिक लक्ष घालण्यासाठी उपायोजना आखल्या जाणार आहेत, असे पोलीस आयुक्त यशस्वी यादव, सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी कळविले.

Web Title:  Criminal decline declares statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.