परीक्षाशुल्क हडपणाºया महाविद्यालयांवर फौजदारी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 09:49 PM2019-01-22T21:49:23+5:302019-01-22T21:49:34+5:30
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना देण्यात आलेले परीक्षा शुल्क हडप करणाºया महाविद्यालयांवर फौजदारी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.
औरंगाबाद : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना देण्यात आलेले परीक्षा शुल्क हडप करणाºया महाविद्यालयांवर फौजदारी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेतर्फे उच्च शिक्षण सहसंचालकांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.
मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर २०१४-१५, २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झाले होते. त्याचा निधी सहसंचालक, विद्यापीठामार्फत महाविद्यालयांना वितरितही करण्यात आला. महाविद्यालयांना मिळालेले हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना मिळालेच नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत आवाज उठविला आहे. ‘मनविसे’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे यांची भेट घेतली. शुल्क परत न करणाºया महाविद्यालयांवर तात्काळ कारवाई करावी, महाविद्यालयांना पाठिशी घालू नये. अशा शुल्क वाटपात निष्काळजीपणा करणाºया महाविद्यालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी निवेदनात केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर, उपाध्यक्ष प्रतिक गायकवाड, कार्तिक फरकडे, संदीप राजपूत, रितेश देवरे, उमेश काळे, किरण पाटील, शुभम घोरपडे, सचिन कुंटे, गजानन गोमटे, विशाल गोंधळे, किरण म्हस्के, रविराज कांबळे आदी उपस्थित होते.