लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 07:00 PM2019-01-22T19:00:02+5:302019-01-22T19:01:00+5:30
सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम व रेखाकंनप्रकरणी विकासकांना अभय देणाºया स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाºयांना सहआरोपी करून गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे.
वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम व रेखाकंनप्रकरणी विकासकांना अभय देणाºया स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाºयांना सहआरोपी करून गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. सिडको प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाºयांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
वडगाव कोल्हाटी, शरणापूर, शेखापूर, साजापूर, रांजणगाव, घाणेगाव, जोगेश्वरी, वाळूज आदी गावांचा समावेश सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात झालेला आहे. सिडको प्रशासनाच्या परवानगीशिवाय या क्षेत्रात बांधकाम व भूखंड विक्रीस बंदी आहे. मात्र, अनेकांनी स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आदींना हाताशी धरून अनेक खाजगी गट नंबरमध्ये भूखंडांची विक्री व गृहप्रकल्प उभारले आहेत. याप्रकरणी नागरिकांनी सिडको प्रशासन, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि.प. व पंचायत समितीकडे तक्रारी केल्या आहेत. यानंतर जागे झालेल्या सिडको प्रशासनाने सर्वेक्षण करून पाहणी केली होती. तीन महिन्यांपूर्वी सिडको प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत २० लोकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.
या क्षेत्रातील भूखंडांच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या दफ्तरी घेऊन त्यांना नमुना नंबर ८ चे उतारे दिले आहेत. तसेच बांधकाम परवानगी दिल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या भूखंड व घराच्या नोंदी ग्रामपंचायतीच्या उताºयावर घेणाºया, तसेच बांधकाम परवानगी देणाºया सरपंच, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयांना सहआरोपी करण्यात यावे, यासाठी सिडकोकडून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात पत्र देण्यात आल्याचे सहायक वसाहत अधिकारी गजानन साटोटे यांनी सांगितले. याविषयी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा देत याप्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले.
सरपंच, ग्रामसेवकाचे धाबे दणाणले
सिडकोची परवानगी न घेता, तसेच नमुना नंबर ८ व बांधकाम परवानगी देताना स्वाक्षरी करणाºया सरपंच व ग्रामसेवकांना सहआरोपी करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे वाळूज परिसरातील सरपंच व ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहे.