संकट दुष्काळाचे! १०२ दिवसांत ३० दिवसच बरसला, पावसाचा मराठवाड्यातून काढता पाय

By विकास राऊत | Published: September 13, 2023 12:03 PM2023-09-13T12:03:38+5:302023-09-13T12:05:38+5:30

जूनपासून आजवर १०२ दिवसांत सरासरी ३० दिवसच पाऊस मराठवाड्यात बरसला

Crisis of drought! With very little avg fall rain leaves from Marathwada | संकट दुष्काळाचे! १०२ दिवसांत ३० दिवसच बरसला, पावसाचा मराठवाड्यातून काढता पाय

संकट दुष्काळाचे! १०२ दिवसांत ३० दिवसच बरसला, पावसाचा मराठवाड्यातून काढता पाय

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यावर येणाऱ्या काळात दुष्काळाचे संकट घोगावू लागले आहे. जूनपासून आजवर १०२ दिवसांत सरासरी ३० दिवसच पाऊस मराठवाड्यात बरसला असून ७ सप्टेंबरपासून पुनरागमन केलेल्या पावसानेदेखील दोन दिवसांपासून काढता पाय घेतला आहे. पाच दिवसांत थोडाच पाऊस पडला. ६ सप्टेंबरला सायंकाळी पावसाचे पुनरागमन झाले. ११ सप्टेंबरपासून पावसाने दडी मारली आहे. पाच दिवसांत ५० मि.मी.पाऊस बरसला.

जूनपासून किती पाऊस?
मराठवाड्यात जून महिन्यापासून आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४५७ मि.मी. पाऊस झाला आहे. २२२ मि.मी.पावसाची तूट असून पावसाळा संपण्यासाठी १७ दिवस शिल्लक राहिले आहेत.

औरंगाबाद : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : २७
सरासरी : ५८१ मि.मी. तूट : २१९ मि.मी.

जालना: एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : २८
सरासरी : ६०३ मि.मी. तूट : २३५ मि.मी.

बीड : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : १८
सरासरी : ५६६ मि.मी. तूट : २५७ मि.मी.

लातूर : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : २२
सरासरी : ७०६ मि.मी. तूट : २९६ मि.मी.

उस्मानाबाद: एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : १९
सरासरी : ६०३ मि.मी. तूट : २६० मि.मी.

नांदेड : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : ३४
सरासरी : ८१४ मि.मी. तूट : ३३ मि.मी.

परभणी : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस :२५
सरासरी : ७६१ मि.मी. तूट : ३६९ मि.मी.

हिंगोली : एकूण दिवस : १०२, पावसाचे दिवस : ३१
सरासरी : ७९५ मि.मी. तूट : २१२ मि.मी.

तुम्हीच सांगा कसे जगायचे?
टोमॅटोचे बाजारपेठेत दर कोसळल्याने ऐन दुष्काळाच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडले आहेत. जे पिकले त्याला भाव नाही. दुसरीकडे पावसाअभावी खरीप पिके वाळून गेली आहेत. लाडसावंगी भागात यंदा काही शेतकऱ्यांनी टरबूज लागवड केली. मागील महिन्यात टरबुजाला पस्तीस ते चाळीस रुपये किलोचा दर होता. परंतु गेल्या आठवड्यात बारा ते अठरा रुपये प्रतिकिलोचा दर मिळाल्याने शेतकरी आहेत. दुष्काळाचे संकट, आहे त्या मालाला भाव नाही. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी कसे जगावे, असा प्रश्न आहे.

प्रमुख पिके कोणती?
प्रमुख पिके : कापूस, मका, सोयाबीन
एकूण लागवड क्षेत्र : ४० लाख हेक्टर

मोठ्या धरणातील पाणीसाठा
प्रकल्प..........२०२२.......२०२३

जायकवाडी.... ९६ टक्के....३४ टक्के
निम्म दुधना.....७५ टक्के.....२५ टक्के
येलदरी........१०० टक्के......६१ टक्के
सिध्देश्वर....१०० टक्के.......५५ टक्के
माजलगाव....७२ टक्के......१२ टक्के
मांजरा.....४४ टक्के.......२४ टक्के
पेनगंगा....९७ टक्के.......७० टक्के
मानार....१०० टक्के.......५७ टक्के
निम्न तेरणा.....९६ टक्के......२५ टक्के
विष्णूपुरी......७९ टक्के......८६ टक्के
सिना कोळेगाव....५१ टक्के....०० टक्के
एकूण........९२ टक्के.........४४ टक्के

Web Title: Crisis of drought! With very little avg fall rain leaves from Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.