मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:03 AM2017-12-24T01:03:06+5:302017-12-24T01:03:11+5:30

मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा कोणताही मोठा प्रकल्प औरंगाबादेत येण्यापूर्वीच त्याला पळवून नेण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत शिखर समजली जाणारी ‘आयआयएम’ही संस्था नागपूरला पळवून नेण्यात आली. या मोबदल्यात स्कूल आॅफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट ही संस्था औरंगाबादला देण्यात आली होती. ही संस्थाही मुख्यमंत्र्यांनी पुण्याला पळवून नेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठविली आहे.

 The criticism of the chief minister ... | मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड...

मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा कोणताही मोठा प्रकल्प औरंगाबादेत येण्यापूर्वीच त्याला पळवून नेण्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत शिखर समजली जाणारी ‘आयआयएम’ही संस्था नागपूरला पळवून नेण्यात आली. या मोबदल्यात स्कूल आॅफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट ही संस्था औरंगाबादला देण्यात आली होती. ही संस्थाही मुख्यमंत्र्यांनी पुण्याला पळवून नेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठविली आहे.
अन्याय सहन करणार नाही
आयआयएम नागपूरला नेल्यानंतर मराठवाड्याच्या जनतेने तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मराठवाड्याचा रोष लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्वरित स्कूल आॅफ प्लॅनिंग ही संस्था देण्याचे आश्वासन दिले. आता औरंगाबादहूनही ही संस्था पुण्याला नेण्यात आल्यास आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही. त्यासाठी तीव्र जनआंदोलन उभे करण्यात येईल.
धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानसभा
सेना स्टाईल आंदोलन करू
आठ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत वाल्मी येथील कार्यक्रमात एसपीए औरंगाबादला मंजूर झाल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्रीच प्रकाश जावडेकरांना ही संस्था पुण्याला नेण्यासाठी पत्र देत असतील, तर गंभीर बाब आहे. हा अन्याय आपण होऊ देणार नाही. जावडेकरांनाही पत्र पाठवून ही प्रक्रिया थांबविण्यात येईल. गरज पडली तर सेना स्टाईल आंदोलनही करण्यात येईल.
चंद्रकांत खैरे, खासदार
मुख्यमंत्र्यांचा निषेध
शिवसेना-भाजप युतीने नेहमीच मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागील तीन वर्षांमध्ये या विभागावर अन्यायच झाला आहे. ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्ट’ ही संस्था पळवून नेणे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. मी मुख्यमंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. युतीला भरभरून मतदान करणाºया जनतेने याचा कुठेतरी विचार करावा.
सतीश चव्हाण, आमदार
सर्वपक्षीय आंदोलन करणार
आयआयएम नागपूरला नेण्यात आले. त्या मोबदल्यात औरंगाबादला स्कूल आॅफ प्लॅनिंग दिले होते. पुण्याला अगोदरच राष्टÑीय पातळीवरील अनेक शैक्षणिक संस्था आहेत. औरंगाबादला या संस्थेची खूप गरज होती. सर्व काही पुण्याला देणार असाल, तर या भागाचा विकास कसा होईल.? याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. या मुद्यावर सेना, राष्टÑवादी आदी पक्षांना सोबत घेऊन मराठवाड्याच्या विकासासाठी आंदोलन उभे करण्यात येईल.
इम्तियाज जलील, आमदार
रस्त्यावर उतरावेच लागेल
स्कूल आॅफ प्लॅनिंगच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची भूमिका दुटप्पी असल्याचे दिसून येते. मराठवाड्याच्या राजधानीवर झालेला अन्याय कदापि खपवून घेतला जाणार नाही. हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले आहे, अन्यथा या मुद्यावर सरकारची जोरदार कोंडी केली असती. अजूनही वेळ गेलेली नाही. एसपीए औरंगाबादलाच राहील यासाठी रस्त्यावरही उतरण्याची आमची तयारी आहे.
अब्दुल सत्तार, आमदार

Web Title:  The criticism of the chief minister ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.