तोंडोळी येथे पीक पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:06 AM2021-09-06T04:06:02+5:302021-09-06T04:06:02+5:30
प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम सन २०२१-२२ हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी व राज्य शासनाचे ...
प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम सन २०२१-२२ हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी विमा कंपनीचे अधिकारी व राज्य शासनाचे अधिकारी, तसेच शेतकरी प्रतिनिधी यांनी पाहणी केली. गत महिन्यात महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे मका, तूर, कापूस आदी पिकांची वाढ खुंटली होती. त्यानुषंगाने शासनाने नियुक्त केलेल्या पथकाने संयुक्त पाहणी केली. यावेळी सहायक कृषी पर्यवेक्षक राधाकृष्ण कारले, सरपंच संजय गरड, माजी सरपंच संजय गुंजाळ, ग्रा.पं. सदस्य विष्णू शेळके, मधुकर नरवडे, अरुण तांबे, चंद्रकांत आगळे, शमशोद्दीन पठाण, अरुण गरड, काशीनाथ गरड, रामचंद्र तांबे, अहेमद शेख, प्रभाकर तांबे, शाकीर शेख, गौतम वाकडे, संतोष गुंजाळ, कारभारी उघडे, दत्ता वाकचौरे, सोपान गुंजाळ आदींची उपस्थिती होती.
050921\img-20210905-wa0022.jpg
तोंडवळी येथे विमा धोरण निश्चित करण्यासाठी पिक पाहणी