वैजापूर तालुक्यासाठी २१ कोटींचा पीकविमा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:04 AM2021-05-27T04:04:32+5:302021-05-27T04:04:32+5:30
कापूस पिकासाठी शेतकऱ्यांना १७ कोटी २८ लाख ४८ हजार ९१५ रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे. मुगासाठी ३ कोटी ९१ ...
कापूस पिकासाठी शेतकऱ्यांना १७ कोटी २८ लाख ४८ हजार ९१५ रुपयांची विमा रक्कम मिळणार आहे. मुगासाठी ३ कोटी ९१ लाख २५ हजार ८९१ रुपयांचा विमा मंजूर झाला, तर कांद्यासाठी केवळ दोन मंडळातील शेतकऱ्यांना ४ लाख ४८ हजार १६३ रुपयांचा परतावा मिळणार आहे. तालुक्यातील लासूरगाव मंडळाला कापूस पिकासाठी सर्वाधिक १८ हजार ३३७ रुपये प्रति हेक्टर विमा मंजूर झाला, तर कपाशीसाठी बोरसर मंडळाला सर्वांत कमी ३,१५२ रुपये प्रतिहेक्टर विमा मंजूर झाला आहे. मूग व कांदा पिकांसाठीही पीक विमा मंजूर झाला असून मुगासाठी जास्तीत जास्त ९,१७० रुपये व कमीत कमी ७ हजार ९३८ रुपयांचा विमा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. गारज व लासूरगाव या दोन मंडळांतील एकूण ७२३ शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी प्रति हेक्टरी दोन हजार ९५८ रुपयांचा पीक विमा मिळणार आहे.
----
नऊ मंडळातील कपाशीसाठी १७.२५ कोटींचे अनुदान
कापूस पिकासाठी बोरसर, गारज, खंडाळा, लाडगाव, लासुरगाव, लोणी खुर्द, महालगाव, नागमठाण व शिऊर या नऊ मंडळांतील ४९ हजार ८२१ शेतकऱ्यांना १७.२८ कोटींचा भरघोस परतावा मिळणार असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दहा मंडळांतील २१ हजार ७६१ शेतकऱ्यांना मूग पिकासाठी लाभ मिळणार आहे. त्यासाठी ३.९१ कोटी अनुदान मंजूर झाले आहे. लासुरगाव व गारज मंडळातील ७२३ शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी जवळपास साडेचार लाख रुपयांचा विमा मिळाला आहे.