पिके गेली पाण्याखाली; शेतकºयांचे स्वप्न भंगले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 01:03 AM2017-09-19T01:03:36+5:302017-09-19T01:03:36+5:30

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा झालेल्या जोरदार पावसाने गोदावरीला पूर आल्याने कायगाव परिसरातील धरणाच्या संपादित क्षेत्रातील सुमारे १७०० हेक्टर शेती वाहून गेली.

The crops are under water | पिके गेली पाण्याखाली; शेतकºयांचे स्वप्न भंगले!

पिके गेली पाण्याखाली; शेतकºयांचे स्वप्न भंगले!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कायगाव : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा झालेल्या जोरदार पावसाने गोदावरीला पूर आल्याने कायगाव परिसरातील धरणाच्या संपादित क्षेत्रातील सुमारे १७०० हेक्टर शेती वाहून गेली.
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध धरणांतून येणाºया पाण्याने जायकवाडी धरण ९० टक्क्यांकडे वाटचाल करत आहे. या पुराच्या पाण्याने मात्र कायगाव परिसरातील धरणाच्या संपादित क्षेत्रातील सुमारे १७०० हेक्टर शेती वाहून गेली. परिसरातील जुने कायगाव, अंमळनेर वस्ती, जुने लखमापूर, गळनिंब शिवार, धनगरपट्टी, भिवधानोरा आदी गावच्या गोदाकाठावरील धरण संपादित क्षेत्रात सुमारे १७०० हेक्टर जमिनीवर शेतकरी लहान-मोठी पिके घेतात. यात प्रामुख्याने कापूस, बाजरी, मूग, तूर, ऊस आदी पिकांचा समावेश आहे.
नदी पात्रानजीक असलेल्या आणि धरणाची साठवणूक क्षमता २० टक्के असते एवढे पाणी पात्रात जमा राहील अशा जमिनीत लवकर येणारे पिक घेतले जाते. नदीला पाणी येण्यापूर्वीच पीक हातात येईल, याची काळजी तेथील शेतकºयांकडून घेतली जाते. तर धरणाची साठवणूक क्षमता ४० ते ५० टक्के झाल्यावर नदीची पाणीपातळी असलेल्या जमिनीत कापूस, तूर अशी पिके घेतली
जातात. दरवर्षी नदीकाठावर कसणारे शेतकरी थोड्याफार प्रमाणात पिकांपासून उत्पन्न मिळवितात. यंदा मात्र नाशिक जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने आणि पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने सगळी पिके जमीनदोस्त झाली.

Web Title: The crops are under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.