मराठवाड्यात अवकाळीमुळे चार कोटींच्या पिकांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:06 AM2021-03-04T04:06:24+5:302021-03-04T04:06:24+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यात चालू वर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे चार कोटी रुपये ...

Crops worth Rs 4 crore destroyed in Marathwada | मराठवाड्यात अवकाळीमुळे चार कोटींच्या पिकांचा चुराडा

मराठवाड्यात अवकाळीमुळे चार कोटींच्या पिकांचा चुराडा

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यात चालू वर्षीच्या जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे चार कोटी रुपये किमतीच्या पिकांचे नुकसान झाले असून, त्यासाठी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे.

विभागीय प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केले असून, ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या मदतीसाठी १३ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जिरायत पिके घेतलेल्या एक हजार ८२ शेतकऱ्यांचे ज्वारी आणि हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.

जिल्हा शेतकरी अपेक्षित मदत

औरंगाबाद ६०९७ ३ कोटी ४५ लाख

जालना ६२८ ११ लाख ८८ हजार

बीड ६९८ २३ लाख ६० हजार

उस्मानाबाद १०४ १४ लाख १५ हजार

एकूण ७५२७ ३ कोटी ९५ लाख

Web Title: Crops worth Rs 4 crore destroyed in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.