रविवारीही उडाली झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:59 AM2017-07-31T00:59:44+5:302017-07-31T00:59:44+5:30

कधी आॅनलाईन तर कधी आॅफलाईनच्या कारणामुळे तसेच इतर तांत्रिक अडचणीतून मार्ग निघाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांची बँकांपुढे गर्दी झाली.

Crowd for crop insurance | रविवारीही उडाली झुंबड

रविवारीही उडाली झुंबड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कधी आॅनलाईन तर कधी आॅफलाईनच्या कारणामुळे तसेच इतर तांत्रिक अडचणीतून मार्ग निघाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांची बँकांपुढे गर्दी झाली. रविवारी सुटीच्या दिवशी बँका सुरु ठेवण्याचे आदेश मिळाल्याने दिवसभर पीकविमा भरणा करण्यात आला.
जिल्ह्यातील १८ बँकांच्या २०३ शाखांमधून पीकविमा भरण्याची प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता रविवारी सुरळीत सुरु होती. शेतकरी पहाटेपासून सायंकाळपर्यंत रांगेत उभे होते, तर नंबर लवकर यावा म्हणून महिला शेतकºयांची गर्दी ठिकठिकाणी दिसून आली. गर्दी आणि वेळ मर्यादेमुळे बँक कर्मचाºयांवर दडपण आले होते. तरीही बँकांमधील कामकाज सुरळीत राहिले.
जिल्ह्यात ५९ शाखा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत. या शाखांमध्ये २०० अतिरिक्त संगणक आणि मनुष्यबळ उपलब्ध करुन पीकविमा भरण्याची प्रक्रिया गतीने पार पाडण्यात येत असल्याचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सांगितले. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात ४० हजार अर्ज स्वीकारण्यात आले. रविवारी किमान ६० हजार अर्ज स्वीकारले जातील असे त्यांनी सांगितले. जिल्हा व पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्यामुळे बँकांमधील कामकाज व्यवस्थित पार पडत असल्याचे सांगून शेतकºयांनी शांततेत पीकविमा भरणा करावा. अखेरच्या दिवसापर्यंत पीकविमा स्वीकारला जाणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, जिल्ह्यात रविवारी १ लाखांपेक्षा अधिक शेतकºयांनी पीकविमा भरला आहे. आतापर्यंत पीकविमा भरलेल्या अर्जाचा आकडा ३ लाखांपेक्षा जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पीकविमा भरण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला असल्याने व निम्म्यावर शेतकरी अद्याप पीकविम्या भरण्याच्या प्रतीक्षेत असल्याने बँकांना कामाची गती वाढवावी लागणार आहे.

Web Title: Crowd for crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.