दाक्षायणी देवीच्या दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:31 AM2017-09-25T00:31:21+5:302017-09-25T00:31:21+5:30
लासूरगाव येथील औरंगाबाद जिल्ह्याचे दैवत असलेल्या श्री देवी दाक्षायणी मातेच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
लासूरगाव : लासूरगाव येथील औरंगाबाद जिल्ह्याचे दैवत असलेल्या श्री देवी दाक्षायणी मातेच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
रविवारी लासूरगाव येथे ६० हजारांहून अधिक भाविकांनी मातेचे दर्शन घेतले. येथील उंदीरवाडी, राहेगाव, सोनवाडी, राजुरा, भायगाव, मांडकी, धोंदलगाव, अमानतपूरवाडी, लासूर स्टेशन, शहाजतपूर, जळगाव, हडस पिंपळगाव, करंजगाव आदी गावांतील भाविकांनी पायी येऊन दर्शनाचा लाभ घेतला.
गुरुवारी (दि.२८) येथे सकाळी ६.४० वाजता होमहवन पूजेस प्रारंभ होणार आहे. यानंतर रात्री ९.४० वाजता होमाची पूर्णाहुती होईल. शुक्रवारी (दि.२९) पहाटे ५ वाजता श्री देवी दाक्षायणी मातेचा महाभिषेक करण्यात येईल. तर शनिवारी (दि.३०) सायंकाळी ६ वाजता विजयादशमी उत्सवाने नवरात्र उत्सवाची सांगता होईल. नवरात्र महोत्सव काळात मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिराचे पदाधिकारी, विश्वस्त मंडळ कर्मचारी, गावकरी परिश्रम घेत आहेत.