पहिल्या श्रावण शनिवारनिमित्त भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:27 PM2018-08-18T13:27:01+5:302018-08-18T13:30:35+5:30

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी  श्रावणाच्या पहिल्या शनिवारी आज लाखो भाविकांनी गर्दी केली.

The crowd of devotees to celebrate Bhadra Maruti for the first Shravan Shaniwar | पहिल्या श्रावण शनिवारनिमित्त भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

पहिल्या श्रावण शनिवारनिमित्त भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

googlenewsNext

खुलताबाद (औरंगाबाद ) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या खुलताबाद येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी  श्रावणाच्या पहिल्या शनिवारी आज लाखो भाविकांनी गर्दी केली. श्रावण शनिवारनिमित्त मारूतीच्या मुर्तीचा शृगांर साडेतीन लाख बेलपत्रांनी करण्यात आला आहे.

हिंदू धर्मात श्रावण महिन्यास विशेष महत्व आहे. यात आज पहिलाच श्रावणी शनिवार असल्याने ऱात्रीपासुनच येथील भद्रा मारूतीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली. दर्शनासाठी औरंगाबाद शहर व संपूर्ण जिल्ह्यातून अनेक भाविक शुक्रवारी रात्रीच खुलताबादच्या दिशेने पायी निघाले. यात औरंगाबाद शहरातून येणा-या  भाविकांची संख्या लक्षणीय होती. या पायी  येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी औरंगाबाद ते खुलताबाद मार्गावर ठिकठिकाणी सेवाभावी, सामाजिक  संस्थेतर्फे चहपाणी व फराळांची व्यवस्था करण्यात आली. 

जय भद्राचा जयघोष करीत  भाविकाचे जत्थे चोहोबाजुच्या रस्त्याने येत आहेत. रात्रीपासुनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली. पवनपुत्र हनुमान कि जय, बजरंग बली कि जय, भद्रा हनुमान कि जय असा जयघोष करत भाविकांनी मारुतीचे दर्शन घेतले.  पोलीस निरीक्षक हरीश खेडकर  व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. भाविकांचे सुरऴीत दर्शन व्हावे म्हणून भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पा. बारगळ, सचिव कचरू पा. बारगळ, विश्वस्थ लक्ष्मण फुलारे, महादू वरपे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे  व  कर्मचारी ,पदाधिकारी व स्वंयसेवक परिश्रम घेत आहेत. 

आकर्षक सजावट 
औरंगाबाद येथील जयसुख पटेल हे श्रावण महिन्यात जररोज भद्रा मारूतीचा आकर्षक शृगांर करतात त्यातच श्रावणामधील दर  शनिवारी वेगवेेगळ्या फऴा-फुलांनी शृगांर करतात. आज पहिल्या शनिवारी जयसुख पटेल यांनी साडेतीन लाख बेलपत्रांनी भद्रा मारूतीची मुर्तीची आकर्षक सजावट केली. 

Web Title: The crowd of devotees to celebrate Bhadra Maruti for the first Shravan Shaniwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.