पंढरपुरात एकादशीनिमित्त भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:40 PM2019-06-13T22:40:51+5:302019-06-13T22:40:57+5:30
निर्जला एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात गुरुवारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
वाळूज महानगर : निर्जला एकादशी निमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात गुरुवारी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
वाळूज महानगरातील श्री क्षेत्र छोट्या पंढरपुरातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राजेंद्र पवार यांच्या हस्ते सकाळी महा अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिर खुले होताच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
त्यामुळे मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या. दुपारी ह.भ.प. नारायण महाराज सावखेडकर यांचे किर्तन झाले. त्यानंतरही दिवसभर हरिपाठ, जागर आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे अध्यक्ष रत्नाकर शिंदे, सचिव भिकाजी खोतकर, विठ्ठल वाकळे, हरिभाऊ शेळके, संतोष कांबळे, आप्पा झळके, जयवंत आवाळे, रतन पेरे आदींनी परिश्रम घेतले.