वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:15 PM2017-07-24T17:15:38+5:302017-07-24T17:16:41+5:30
पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली.
ऑनलाईन लोकमत
बीड/ परळी : पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापेैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली. संपूर्ण देशभरातून भाविक वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येथे दाखल झाली आहेत
वैद्यनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महिला, पुरूष आणि पासधारकांसाठी वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्याने भाविकांना दर्शन सुलभ झाले आहे. यावेळी भाविकांच्या जय घोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.
यासोबतच शहरातील जगमित्र नागा मंदिर, सुरेवेश्वर मंदिर, जिरेवाडी येथील सोमेश्वर मंदिर, नाथरा येथील पापनाथेश्वर मंदिर सुद्धा भाविकांनी फुलून गेला होता.
दरम्यान काशी चे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या श्रावणमास तपोनुष्ठाणा निमीत्ताने वैजनाथ मंदिर दर्शन मंडप येथुन भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शोभायात्रेत शिवाचार्य सोनपेठकर महाराज,नागरसुल महाराज जिंतूर, महाडेकर महाराज, पाथरी महाराज ,बार्शी महाराज यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थितीत होते.