गर्दी हटेना, रुग्ण घटेनात; जिल्ह्यात सध्या २,४४५ रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 11:36 AM2021-03-04T11:36:43+5:302021-03-04T11:44:12+5:30

corona virus in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार २८७ झाली आहे, तर आतापर्यंत ४७ हजार ५६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

The crowd does not move, the patient does not fall; At present 2,445 corona patients are undergoing treatment in the district | गर्दी हटेना, रुग्ण घटेनात; जिल्ह्यात सध्या २,४४५ रुग्णांवर उपचार सुरू

गर्दी हटेना, रुग्ण घटेनात; जिल्ह्यात सध्या २,४४५ रुग्णांवर उपचार सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देबुधवारी एकूण ३०८ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झालेबुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात ३७१ कोरोना रुग्णांची वाढ, ८ जणांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येसह मृत्यूत पुन्हा एकदा काहीशी वाढ झाली; पण त्यासोबत कोरोनामुक्त होणाऱ्यांचीही संख्या वाढली. दिवसभरात तब्बल ३७१ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आणि ३०८ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील ७ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २,४४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार २८७ झाली आहे, तर आतापर्यंत ४७ हजार ५६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३७१ रुग्णांत एकट्या मनपा हद्दीतील ३०७, तर ग्रामीण भागातील ६४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २७९ आणि ग्रामीण भागातील २९, अशा एकूण ३०८ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. समतानगरातील ८० वर्षीय पुरुष, एन-६ सिडकोतील ६८ वर्षीय पुरुष, पुंडलिकनगरातील ८८ वर्षीय पुरुष, एन-४ सिडकोतील ८० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ७७ वर्षीय पुरुष, जालना रोड येथील ७५ वर्षीय पुरुष, शाहनूरवाडीतील ३८ वर्षीय पुरुष आणि परभणी जिल्ह्यातील ३६ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
अग्रसेन विद्यामंदिर १, महेशनगर १, हडको २, छावणी १, भुजबळनगर १, पडेगाव १, एन-९ येथे ४, जाधववाडी १, मयूरपार्क ७, किलेअर्क २, साफल्यनगर १, झांबड इस्टेट १, तापडियानगर १, दर्गा रोड १, बीड बायपास ८, गारखेडा ४, साऊथ सिटी, सिडको १, पदमपुरा १, बेगमपुरा १, शाहनूरवाडी ३, समतानगर १, बन्सीलालनगर ५, टिळकनगर १, ज्योतीनगर २, नूतन कॉलनी १, फकीरवाडी २, पडेगाव ३, एसबी कॉलनी १, श्रेयनगर २, उस्मानपुरा ५, पन्नालालनगर १, हॉटेल ग्रीनव्हॅली १, कोटला कॉलनी १, हर्सूल ८, शिवशंकर कॉलनी १, देवळाई रोड परिसर ५, उल्कानगरी ६, विशालनगर १, खोकडपुरा २, मलबार चौक १, विश्वभारती कॉलनी १, पैठणगेट परिसर २, अंबिकानगर १, एन-५ येथे २, सातारा परिसर ४, सिडको, एन-३ येथे २, एन-४ सिडको ३, एन-२ येथे २, जयभवानीनगर २, अनविका रेसिडेन्सी १, एन-६ सिडको २, श्री भीमसिंग विद्यालय परिसर १, मुकुंदवाडी ३, एन-१, सिडको ६, पारिजातनगर १, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटलजवळ १, खडकेश्वर २, जे.जे. हॉस्पिटल ३, रेल्वे स्टेशन रोड परिसर १, भारतमातानगर २, रायगडनगर सिडको १, पिसादेवी परिसर १, नारळीबाग १, बुकपॅलेस, औरंगपुरा १, समर्थनगर १, टीव्ही सेंटर १, बन्सीलालनगर १, साईनाथ हौ. सोसायटी १, ज्ञानेश्वरनगर १, शिवाजीनगर १, नारळीबाग १, नक्षत्रवाडी १, सिग्मा हॉस्पिटल १, व्यंकटेशनगर १, आकाशवाणी ३, पुंडलिकनगर १, इंडुरन्स कंपनी १, बालाजीनगर २, खडकेश्वर १, दिल्लीगेट परिसर १, शासकीय दूध डेअरी १, पीरबाजार १, पुष्पनगरी १, चेलीपुरा १, घाटी परिसर ३, वृंदावन कॉलनी १, बसैयेनगर १, जालाननगर १, न्यू शांतिनिकेतन कॉलनी २, शाहनूरवाडी १, प्राइड टॉवर १, नागेश्वरवाडी १, शिवशंकर कॉलनी १, विद्यानगर १, ज्ञानेश्वर मंदिर सिडको १, गारखेडा १, अन्य १३०.

ग्रामीण भागातील रुग्ण
वैजापूर ३, सिडको वाळूज ३, कन्नड २, मूर्तिजापूर २, बजाजनगर ९, तीसगाव १, रांजणगाव १, गंगापूर १, फुलंब्री २, अन्य ४०.

वाहकाच्या मृत्यूची माहिती नाही
शहरात एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी एसटी महामंडळाच्या वाहकाचा मृत्यू झाला; परंतु यासंदर्भात आरोग्य यंत्रणेकडून दोन दिवसांनंतरही माहिती देण्यात आलेली नाही.

Web Title: The crowd does not move, the patient does not fall; At present 2,445 corona patients are undergoing treatment in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.