आय्यप्पा मंदिरात दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:23 AM2017-11-04T01:23:57+5:302017-11-04T01:24:08+5:30
सातारा, बीड बायपास रोडवरील श्री स्वामी आय्यप्पा मंदिर परिसरात श्री कार्तिकी स्वामी दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सायंकाळी ७५० त्रिपूरवातीने मंदिराचा परिसर प्रकाशात न्हाऊन निघाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा, बीड बायपास रोडवरील श्री स्वामी आय्यप्पा मंदिर परिसरात श्री कार्तिकी स्वामी दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सायंकाळी ७५० त्रिपूरवातीने मंदिराचा परिसर प्रकाशात न्हाऊन निघाला.
शुक्रवारी व शनिवारी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले असून, भक्तांना विशेष पूजा, अभिषेक करता आला. पहाटेपासूनच रस्त्यावर भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी शिस्तबद्धता होती. प्रवचन तसेच मार्गदर्शनाचा भक्तांनी लाभ घेतला. कार्तिक स्वामींच्या मंदिर परिसरात प्रसादही वाटप करण्यात आला.
शनिवारीदेखील दर्शनाचा लाभ
कार्तिक पौणिमेनिमेनिमित्त सातारा-देवळाई परिसर तसेच शहरातील भक्तांनी कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी मेणबत्ती व मोरपिस घेऊन गर्दी केली होती. शनिवारी दर्शन तसेच कीर्तन, महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री आय्यप्पा सेवा संघाच्या वतीने पदाधिका-यांनी केले आहे.
दिव्यांनी उजळला परिसर
शुक्रवारी सायंकाळी आय्यप्पा मंदिर परिसरात ७५० दिवे लावण्यात आले. त्या दिव्यांनी मंदिर प्रकाशात न्हाऊन गेले होते.