प्लॅटफॉर्मवर गर्दी काही ओसरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:06 AM2021-03-13T04:06:33+5:302021-03-13T04:06:33+5:30
औरंगाबाद येथून सतरा गाड्यांची वाहतूक सुरू आहे. काही मोजक्याच गाड्यांना प्रवासी संख्या वाढीव प्रमाणात असते. स्थानकावर प्रवाशांसह नातेवाईकांची गर्दी ...
औरंगाबाद येथून सतरा गाड्यांची वाहतूक सुरू आहे. काही मोजक्याच गाड्यांना प्रवासी संख्या वाढीव प्रमाणात असते. स्थानकावर प्रवाशांसह नातेवाईकांची गर्दी पाहण्यास मिळते. प्रवाशांनी खबरदारी घेणे गरजेचे असते, असे प्रशासन वारंवार सांगत असले तरी त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. येथे प्लॅटफॉर्म तिकीट कोणी खरेदी करत नाही. कारण ऑनलाइन तिकीट खरेदी केल्यानंतर प्रवासी हा स्थानकात जातो. त्याला सोडण्यासाठी नातेवाईक व मित्रपरिवार त्याच्यासोबत आलेला असतो. त्यांना कोणीही प्लॅटफॉर्म तिकीट हटकत नाही. इतरत्र प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत वाढली असली तरी कोणाला काही घेणे नाही. प्रवासी हजारोंच्या संख्येने दररोज आढळून येत आहेत. मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा अशा पाट्या जरी लावलेल्या असल्या तरी त्याकडे प्रवासी दुर्लक्ष करताना आढळून येत आहेत.
प्रवाशांची सतत गर्दी...
रेल्वे स्थानकावर येणाऱ्या गाड्यांची संख्या सतरा असून त्यात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी मोठ्या संख्येने असते. ऑनलाईन बुकिंग केलेल्या प्रवाशांना प्रवास करता येत आहे. स्थानकात बुकिंग काढण्याची सेवा सुविधा सुरू झालेली नाही. त्यामुळे ठरलेल्या वेळेनुसार प्रवासी स्थानकावर येताना दिसत आहेत. सोबत आलेले त्यांचे नातेवाईक गर्दीत भर घालताना दिसतात.
खबरदारी घेतली पाहिजे...
स्थानकावर होणारी गर्दी लक्षात घेता ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करू नये, प्रवासी तपासण्यासाठी येथे गोव्याचे पथक आहे. परंतु प्लॅटफॉर्मवर अवास्तव गर्दी टाळावी.
- रामकुमार सोनवणे (प्रतिक्रिया)
रिक्षाने ये-जा करणारे प्रवासी सोडतो..
स्थानकावर जाण्यासाठी प्रवासी घाई करतात. या प्रवाशांना आम्ही वाहनाने येथे सोडतो. त्यांच्या ठरलेल्या नियमानुसार प्रवासी सोडण्यासाठी स्थानकावर येतो.
- विजय जाधव (प्रतिक्रिया)
ऑनलाईन बुकिंग आहे....
रेल्वे स्थानकावर तिकीट खिडकी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद आहे. त्यामुळे ऑनलाइन तिकीट बुकिंग व्यवस्था प्रणाली वापरण्यात आलेली आहे. प्रवासी ऑनलाईन बुकिंगनुसार येऊन प्रवासासाठी सज्ज असतात. प्लॅटफॉर्मवर मला हवी तशी गर्दी सध्या कमी झालेली आहे.
- रेल्वे अधिकारी
कॅप्शन... रेल्वेस्थानकात रेल्वेची वाट पाहत बसलेले भरगच्च प्रवासी.