कपडे खरेदीसाठी बाजारपेठत झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 07:26 AM2020-11-12T07:26:31+5:302020-11-12T07:26:31+5:30
औरंगाबाद : दिवाळीतील लक्ष्मीपूजन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. यामुळे बाजारपेठत खरेदीचा महाउत्सव सुरू आहे. यात, सर्वात पहिले ...
औरंगाबाद : दिवाळीतील लक्ष्मीपूजन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. यामुळे बाजारपेठत खरेदीचा महाउत्सव सुरू आहे. यात, सर्वात पहिले रेडिमेड कपडे खरेदीला प्रधान्य दिले जात आहे.
कामगार, कर्मचारी यांच्या हातात बोनस व पगार आला आहे. व सध्या बाजारात खरेदीचा महाउत्सव सुरू आहे. कपडे खरेदी शिगेला पोहोचली आहे. बाजारात जिकडे बघू तिकडे गर्दीच गर्दी दिसत आहे. पैठणगेट ते सिटीचौकपर्यंत, गुलमंडी ते निरालाबाजार, उस्मानपुरा, या शहरातील जुन्या बाजारपेठ गर्दी आहेच. त्या शिवाय जालना रोड, काल्ड कॉर्नर ते पिर बाजार, आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक, सेव्हनहिल चौक ते गारखेडा, शिवाजीनगर पर्यंत, जालना रोड, बीड बायपास रोड, सिडको, हडकोपर्यंत सर्व बाजारपेठत दुकाना दुकानात खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर पुंडलिकनगर ते जयभवानी नगर व सिडको बसस्थानकपर्यंतच्या दुकानातही तेवढीच गर्दी बघण्यास मिळत आहे.
कपडेच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, आकाश कंदीलपर्यंत विविध खरेदी केली जात आहे. दररोज कोट्यवधीची उलाढाल होत आहे. कापड व्यापाऱ्यांना घरी जायला रात्री २ ते अडीच वाजत आहेत. आता पाडव्यापर्यंत बाजारात अशीच गर्दी असणार आहे.
चौकट
रेडिमेड फराळालाही मागणी
बाजारात रेडिमेड फराळालाही मागणी वाढली आहे. विविध महिला बचतगटद्वारे फराळ विकल्या जात आहे. मागील वर्षीच्या भावात विकल्या जात आहे.