लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची उपजिल्हा रुग्णालयात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:05 AM2021-03-04T04:05:16+5:302021-03-04T04:05:16+5:30
ज्येष्ठ नागरिकांसह फ्रंट लाईन वर्कर्स यांनाही लस देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक संघ, सेवानिवृत्त कर्मचारी यांना लस टोचून घेण्याचे ...
ज्येष्ठ नागरिकांसह फ्रंट लाईन वर्कर्स यांनाही लस देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिक संघ, सेवानिवृत्त कर्मचारी यांना लस टोचून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मंगळवारी ३५ जणांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी पी. एम. शिंदे, प्रा. कोंडिराम मगर, अण्णासाहेब शेळके, सुरेश संत, बबन क्षीरसागर, कडू पा. पवार, पी. वाय. चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पाटणी हे लस टोचल्यानंतर नागरिकांना अर्धा तास निगराणीखाली ठेवत आहेत. परिचारिका वैशाली टाक यांना आरोग्य कर्मचारी उर्मिला जाधव, नीतेश चाफेकर, संदीप शेळके, सुरेखा थोरात साहाय्य करीत आहेत.
फोटो कॅप्शन : उपजिल्हा रुग्णालयात कोविड लस घेताना ज्येष्ठ नागरिक.
020321\img-20210302-wa0138_1.jpg
उपजिल्हा रुग्णालयात कोविड लस घेताना ज्येष्ठ नागरिक.